स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 5 – वारे
१. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा :
उत्तरे :
(१) हवा प्रसरण पावली, की विरळ होते
(२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून हवेच्या कमी दाबाकडे वाहतात
(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे पश्चिमेकडे वळतात
(४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात ईशान्येकडून नैऋ्त्येकडे असते
(५) ‘गरजणारे चाळीस’ वारे दक्षिण गोलार्धात ४० दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात
प्रश्न २. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) ‘वारा म्हणजे काय ?
उत्तर : वाबातील फरकामुळे जास्त दाबाच्या पट्टयाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची क्षितीज समांतर होणारी हालचाल, म्हणजे वारा’ होय.
(२) वाऱ्याचे प्रमुख प्रकार कोणते ?
उत्तर : वाऱ्याचे – (१) ग्रहीय वारे (२) स्थानिक वारे व (३) हंगामी वारे हे प्रमुख प्रकार आहेत.
(३) वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात?
उत्तर : वाऱ्याचा वेग किमी प्रती तास किंवा नॉटस् या परिमाणात मोजतात.
(४) कोणत्या प्रकारचे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात?
उत्तर : ग्रहीय वारे वर्षभर नियमितपणे वाहतात.
(५) कोणत्या वाऱ्याना ध्रुवीय वारे’ म्हणतात?
उत्तर : ध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्या वाऱ्याना ध्रुवीय वारे’ म्हणतात.
(६) कोणत्या वाऱ्याना हंगामी वारे’ म्हणतात?
उत्तर : जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात, त्या वाऱ्याना ‘हंगामी वारे’ म्हणतात.
(७) ग्रहीय वारे’ म्हणजे काय ?
उत्तर : जे वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहतात व पृथ्वीचे संपूर्ण क्षेत्र व्यापतात, त्या वाऱ्याना ‘ग्रहीय वारे’ म्हणतात.
(८) स्थानिक वारे’ म्हणजे काय?
उत्तर : जे वारे ठरावीक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात आणि तुलनात्मकदृष्ट्या मर्यादित क्षेत्रात वाहतात त्या वार्याना स्थानिक वारे’ म्हणतात
वर्णनावरून वाऱ्याचा प्रकार ओळखा
(৭) नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.
उत्तर : नैऋत्य मोसमी वारे.
(२) उत्तर धृवीय प्रदेशांकडून ६०° उत्तरेकडे येणाऱ्या या वाऱ्यांमुळे उत्तर अमेरिका, युरोप व रशिया एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात थंडीची तीव्रता वाढते.
उत्तर : धृवीयवारे.
(३) डोंगरमाथे दिवसा लवकर तापतात. तेथील हवा तापून हलकी होते व वर जाते. त्यामुळे या भागात कमी दाब निर्माण होतो. त्याच वेळी डोंगरपायथ्याशी दरीखोऱ्यांत हवा थंड असल्याने जास्त दाब असतो. तेथील हवा कमी दाबाकडे वाहते.
उत्तर : दरीय वारे.
प्रश्न . पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
(१) धृवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो
(৭) धुवीय भागात दोन्ही गोलार्धात वर्षभर तापमान शुन्य अंश सेल्सिअस पेक्षाही कमी असते
त्यामुळे धृवीय भागात दोन्ही गोलार्धात हवा थंह असते व त्यामुळे हवेची धनता जास्त असते. त्यामुळे धृवीय
भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो
(२) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यावर कोणता परिणाम होतो ?
उत्तर : (१) पृथ्वीचे परिवलन हे पश्चिमेकडून पूर्वेकडे होते. पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो. (२) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.
(3) आवर्त वारे चक्राकार दिशेतच का वाहतात?
उत्तर (१) एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो अश वेळी आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते (२) कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र है मध्यभागी असल्यामुळे या प्रदेशात सभोवतालच्या जास्त हवेच्या दाबाकडून सर्व बाजूनी वेगाने वारे बाहतात. त्यामुळे आवर्त वारे चक्राकार दिशेत वाहतात
(४) आवर्त वाऱ्याची कारणे व परिणाम लिहा.
उत्तर :
(अ) आवर्त वाऱ्याची कारणे (१) एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो. (२) सभोवताली हवेचा दाब जास्त असतो.
(ब) आवर्त वाऱ्याचे परिणाम : (१) आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळलेले राहते. (२) आवर्त वारे अत्यंत वेगाने वाहत असल्यामुळे भरपूर पाऊस पडतो. (३) काही प्रसंगी विनाशकारी आवर्त वाऱ्यामुळे किनारयालगतच्या प्रदेशांत जीवितहानी व वित्तहानी होते.
(५) दरीय वारे कसे निर्माण होतात?
उत्तर : (१) दरीय वारे सूर्योदयानंतर (दिवसा) वाहतात. दिवसा पर्वतशिखर लवकर तापते व दरीचा भाग तुलनेने थंड असतो. (२) पर्वतावर हवेचा दाब कमी असतो व दरीच्या भागात हवेचा दाब जास्त असतो. (३) त्यामुळे दिवसा दरीकडून पर्वताकडे थंड वारे वाहतात. ( ४) दिवसा दरीतून थंड हवा पर्वतशिखराकडे वेगाने वर येते व पर्वतशिखराकडील उष्ण व हलकी हवा दरीच्या दिशेने खाली ढकलली जाते अशा प्रकारे दरीय वारे निर्माण होतात.
(६) पर्वतीय वारे कसे निर्माण होतात?
उत्तर : (१) पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर (रात्री) वाहतात. रात्री पर्वतशिखर लवकर थंड होते व दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. (२) पर्यतावर हवेचा दाब जास्त असतो व दरीच्या भागात हवेचा दाब कमी असतो. (३) त्यामुळे रात्री पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. (४) रात्री पर्वतशिखराकडील थंड हवा दरीच्या दिशेने वेगाने खाली येते व दरीतील उष्ण व हलकी हवा पर्वतशिखराकडे ढकलली जाते. अशा प्रकारे पर्वतीय वारे निर्माण होतात.
(७) सागरी (खारे) वारे कसे निर्माण होतात?
उत्तर : (१) दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवाही जास्त तापते व त्यामुळे हवेचा दाब कमी राहतो. (२) याउलट दिवसा समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व तेथे हवेचा दाब जास्त असतो. (३) त्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात. या वाऱ्याना सागरी (खारे) वारे म्हणतात. (४) अशा प्रकार सागरी भागातील हवेचा दाब जास्त व जमिनीवरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे सागरी (खारे) वारे निर्माण होतात.
(८) भूमीय (मतलई) वारे कसे निर्माण होतात ?
उत्तर : (१) रात्री समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात थड होते. त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त राहतो. (२) याउलट रात्री समुद्राचे पाणी उशिरा थंड होते. त्यामुळे समुद्रावरील हवा तुलनेने जास्त तापलेली राहते व तेथे हकेचा दाब कमी असतो. (३) त्यामुळे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहतात. या वार्यानां भूमीय (मतलई) वारे म्हणतात. (४) अशा प्रकारे जमिनीवरील हवेचा दाब जास्त व सागरावरील हवेचा दाब कमी या हवेच्या दाबातील फरकामुळे भूमीय (मतलई) वारे निर्माण होतात.
प्रश्न ५. पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(१) विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो.
उत्तर : (१) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस सुमारे ५° अक्षवृत्तांपर्यंत हवेचा दाब सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखाचे असतो. (२) त्यामुळे वर्षातील बराच काळ विषुववृत्ताच्या भागात वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्तावर हवेचा पट्टा शांत असतो.
(२) उत्तर गोलार्धातील नैॠत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
उत्तर : (१) उत्तर गोलार्धात भूभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात. (२) याउलट दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपुष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर कोणतेही नियंत्रण असत नाही. त्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यापेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
(३) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
उत्तर : (१) उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन अधिक तापलेली राहते. परिणामी उन्हाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने कमी व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने जास्त राहतो. त्यामुळे उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे (वाहतात) येतात. (२) हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमीन तुलनेने कमी तापलेली राहते. परिणामी हिवाळ्यात दीर्घ कालावधीसाठी जमिनीवरील हवेचा दाब हा तुलनेने जास्त व समुद्रावरील हवेचा दाब तुलनेने कमी राहतो. त्यामुळे हिवाळयातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून समुद्राकडे (वाहतात) येतात.
(४) वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
उत्तर : (१) हवेचा दाब एकसमान असेल, तर हवेची हालचाल होत नाही. (२) परंतु, पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. पृथ्वीवर हवेच्या जास्त दाबाचे आणि हवेच्या कमी दाबाचे पट्टे असतात. (३) त्यामुळे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्घाकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते व वाऱ्याची निर्मिती होते. अशा प्रकारे वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.
प्रश्न ६. टिपा लिहा :
(१) लू
(१) उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात दूपारी वाहणारे वारे हे ‘लू’ या नावाने ओळखलेजातात. (२) हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. (३) लू’ हे स्थानिक वारे उष्ण व कोरडे असतात.
(२) सिमूम : (१) सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहणारे वारे हे ‘सिमूम’ या नावाने ओळखले जातात. सिमूम हे स्थानिक वारे उष्ण, कोरडे व विनाशकारी असतात.
(३) चिनूक : (१) उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहणारे वारे हे ‘चिनूक या नावाने ओळखले जातात. (२) चिनूक वाऱ्यामुळे रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरील बर्फ वितळते व दऱ्यामधील तापमानात वाढ होते. (३) चिनूक हे स्थानिक वारे उबदार व कोरडे असतात.
(४) मिस्ट्रल : (१) स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनार्यालगतच्या प्रदेशात वाहणारे वारे हे ‘मिस्ट्रल या नावाने ओळखले जातात. (२) हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनार्यालगतच्या तापमानात घट होते. (३) मिस्ट्रल हे स्थानिक वारे थंड व कोरडे असतात.
(५) बोरा : (१) आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहणारे वारे हे ‘बोरा’ या नावाने ओळखले जातात. (२) बोरा हे स्थानिक वारे थंड आणि कोरडे असतात.
(६) पांपेरो : (१) दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात वाहणारे वारे हे ‘पांपेरो’ या नावाने ओळखले जातात. (२) पांपेरो हे स्थानिक वारे थंड आणि कोरडे असतात.
(७) फॉन : (१) आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहणारे वारे हे ‘फॉन या नावाने ओळखले जातात. (२) फॉन हे बारे उष्ण व कोरडे असतात.
प्रश्न ७. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(৭)ग्रहीय वाऱ्याचे प्रकार स्पष्ट करा.
उत्तर : ग्रहीय वाऱ्याचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(৭) पूर्वीय वारे : दोन्ही गोलाधांत २५’ ते ३५ अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाच्या वार्याना पूर्वीय वारे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्यांची मुळ दिशा बदलते. उत्तर गोलाधात हे वारे ईशान्येकडून नैरूत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात .हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्टयाकडे येऊन मिळतात
(२) पश्चिमी वारे : दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ५५’ ते ६५’ अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपधुवीय कमी दाबाच्या पट्टयाकडे वाहणाच्या वार्याना पश्चिमी वारे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलाधात हे वारे नैऋत्येकडून ईशान्येकडे, तर दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात.
(३) ध्रुवीय वारे : दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्याकडून ५५’ ते ६५’ अक्षवृत्तांच्या दरम्यान असलेल्या उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वार्याना ध्रुवीय वारे म्हणतात. या वाऱ्याची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते
२) आवर्त वाऱ्याचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर : आवर्त वाऱ्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे :
(৭) आवर्त वाऱ्याची निर्मिती : एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. अशा वेळी आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात.
(२) आवर्त वाऱ्याची दिशा : पृथ्वीच्या परिलनामुळे उत्तर गोलार्धात घडयाळाच्या काट्याच्या विरुदध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घडयाळाच्या काटयांच्या दिशेत वाहतात.
(३) आवर्त वाऱ्याची वैशिष्ट्ये : आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते. वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो आवर्त वाऱ्याचे प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्याचा कालावधी वेग दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते हवेची स्थिती दर्शवणाच्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा ‘L’ या अक्षराने दाखवतात.
(४) आवर्त वाऱ्याचे सरकणे : आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी सरकते. आवर्ताना आपण वादळ किंवा चक्रीवादळ म्हणतो.
१ टायफून : पैसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनार्यालगत जून ते ऑक्टोबर या महिन्यांत वादळे निर्माण होतात ही वादळे ‘टायफून या नावाने ओळखली जातात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे ती विनाशकारी असतात.
२. हरिकेन्स : कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे ‘हरिकेन्स’ होय. ही वादळेसुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर ताशी कमीत कमी ६० किमी असतो.
३. समरशीतोष्ण कटिबंधातील आवर्त : समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते. ती विनाशकारी नसतात.
(३) प्रत्यावर्त वाऱ्याचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर : :
(१) प्रत्यावर्त वाऱ्याची निर्मिती : एखादया क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात.
(२) प्रत्यावर्त वाऱ्याची दिशा : उत्तर गोलार्धात प्रत्यावर्त वारे हे घडयाळाच्या काट्यांच्या दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वाहतात.
(३) प्रत्यावर्त वाऱ्याची वैशिष्ट्ये : प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असते. प्रत्यावत्ताची स्थिती ही काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावत्ताचा केंद्रभाग ‘H’ या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जात असल्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते.