स्वाध्याय – प्रश्नोत्तरे – सातवी मराठी 5 -भांड्यांच्या दुनियेत

 5 -भांड्यांच्या दुनियेत 

भांडी व शब्द समजून घेवूया ………..

(१) कोठी – तळघरातील वस्तू साठवायची खोली.

(२) जाते – पूर्वीच्या काळचे दळण दळण्याचे साधन एकावर एक रचलेल्या गोल दगडी चकत्या.

(३) परात – तांबे, पितळ इत्यादी धातूंचे पसरट गोल काठ असलेले मोठे ताट. (पीठ मळण्यासाठी.)

(४) रांजण – उभट गोल मोठे मडके. (पाणी साठवण्यासाठी.)

(५) बुधला उभा, मध्ये फुगीर असलेला गडू.

(६) तुंबे – भोपळ्याचा गर काढून बनवलेले पोकळ, पसरट, गोल भांडे.

(७) आंतरजाल – इंटरनेटला मराठी प्रतिशब्द.

(८) काठवड – पीठ मळण्यासाठीची मोठी गोलाकार लाकडी परात.

(९) उखळ – धान्य कांडण्याचे पोकळी असलेले लाकडी वा दगडी जाड साधन,

(१०) मुसळ- धान्य कांडण्याचे लाकडी उभे व मजबूत साधन.

११) पाटा-वरवंटा- पसरट पंचकोनी टाकी लावलेला सपाट दगड व त्यावर वाटण वाटण्यासाठीचा गोल दंडाकृती दगड.

(१२) मेटेरियल कल्चर (साहित्य संस्कृती) अनेक उपयोगी वस्तूंचा संचय करणारी मानवी परंपरा,

(१३) सिरॅमिक्स चिनी मातीची भांडी.

(१४) किटली – तोटी असलेले चहा साठवण्याचे भांडे.

(१५) सुरई – निमुळता उंच गळा असलेले थातूचे वा मातीचे भांडे.

(१६) शिसे, कासे (कांस्य), अॅल्युमिनिअम, हिंडालिअम – वेगवेगळे धातू

(१७) स्टेनलेस स्टील – लोखडावर प्रक्रया करून बनवलेला गंज न पकडणारा धातू.

(१८) नॉनस्टिक – पदार्थ न चिकटणारी (भांडी).

(२०) फुंकणी – चुलीतल्या लाकडांचा जाळ पेटवण्यासाठी बनवलेली पोकळ लोखंडी लांब नळी.

(१९) कोटेड मेटल – एका धातूचा दुसऱ्या धातूवर लेप लावून तयार केलेली (भांडी).

(२१) घंगाळ – गोल पसरट मोठ्या तोंडाचे, बाजूला कडी असलेले पाणी तापवण्यासाठी वापर असलेले पूर्वीचे भांडे.

(२२) बंब – पाणी तापवण्यासाठी तयार केलेले पूर्वीचे उभट गोलाकार पिंप.

(२३) पत्रावळ झाडाची मोठी पाने काडीने एकत्र टोचून तयार केलेले गोल ताट.

(२४) द्रोण : पानांना काडीने जोडून तयार केलेली वाटी.

(२५) कासंडी (चरवी), कावळा, वाडगा, टोप – दूध व दुधाचे पदार्थ साठवण्याची भांडी.

(२६) बुडगुली, ओगराळी, पळी, तसराणी, कुंड – लाकडी किंवा धातूंचे वेगवेगळ्या आकारांचे चमचे

स्वाध्याय 

 प्रश्न १. पुढील विधानांमागील कारणांचा शोध घ्या :

(१) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.

उत्तर : शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला अन्न शिजवण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी 

भांड्यांची गरज पडली.

(२) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत  होती.

उत्तर : लोखंडी भांडी किंवा तांब्या-पितळेची भांडी पूर्वी सर्वांना परवडणारी नव्हती. त्या वेळी स्टेनलेस स्टील भांड्यांचा शोधही लागला नव्हता. पूर्वी परसामध्ये केळी लावलेल्या असायच्या. केळीचे पान मऊ व लवचीक असते. भांडी धुण्या-घासण्याचा त्रास व वेळ वाचत असे. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानांवर जेवण्याची पद्धत होती.

(३) आज घरोघरी मिक्सर वापरतात.

उत्तर : पाटा व वरवंटा या साधनांनी वाटण वाटण्याची पद्धत होती. मिक्सरमुळे काम वेळ वाचतो व कष्ट कमी झाले. म्हणून आज घरोधरी मिक्सर वापरतात.

(४) मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.

उत्तर : मातीपासून विविध आकारांची भांडी बनवणे शक्य आहे. शिवाय मातीची भांडी स्वस्त व मुबलक प्रमाणात मिळतात. तसेच मातीच्या भांड्यांतील पदार्थ टिकतात व ताजे राहतात. म्हणून मातीच्या भांडयांचा जास्तीत वापर करावा. 

प्रश्न-. भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. ‘या विधानाबाबत तुमचे काय  मत आहे ते स्पष्ट करा.

उत्तर : भूक ही मानवाची मूलभूत गरज आहे. ती भागवण्यासाठी माणूस अन्नावर प्रक्रिया करतो. अन्न शिजवण्यासाठी व साठवण्यासाठी माणसाला पूर्वापार भांड्यांची गरज निर्माण झाली. स्वयंपाकघरात गरजेनुसार भांड्यांमध्ये विविधता येत गेली. जिथे जिथे मानवी समाज आहे, तिथे तिथे भांडी असणारच म्हणूनच, भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.’

प्रश्न . दोन-दोन उदाहरणे लिहा :

(१) मातीची भांडी – मडकी  रांजण

(२) चामड्यापासून बनवलेली भांडी –बुधले  पखाली

(३) लाकडी भांडी – काठवट  उखळी

(४) तांव्याची भांडी  हंडा घंगाळ

(१) माठाला ओले, सुती कापड उन्हाळयात का गुंडाळतात ?

उत्तर : उन्हाळ्यात माठाला गुंडाळलेले ओले. सुती कापड माठाच्या आतील पाण्याची उष्णता शोषून घेते. त्यामुळे माठातील पाणी थंड राहते. म्हणून माठाला ओले, सुती कापड उन्हाळ्यात गुंडाळतात.

(२) मातीचा माठ, रांजण जमिनीत का पुरतात ?

उत्तर : जमिनीतील खोल थरामध्ये पृष्ठभागावरची उष्णता खाली झिरपत नाही. त्यामुळे माठ किंवा रांजण

यातील पाणी थंड राहते. म्हणून मातीचा माठ, रांजण जमिनीत पुरतात.

(३) बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा ?

उत्तर : लोखंडी वस्तू टिकाऊ असतात. लोखंड हे मजबूत असल्यामुळे इमारत दीर्घकाळ टिकण्यासाठी लोखंड या धातूचा उपयोग बांधकामात मोठ्या प्रमाणात होतो.

(४) लोखंडाच्या कढईत वा तव्यात भाजी का करतात ?

उत्तर : लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात भाजी करतात. कारण कमी इंधनात लोखंड जलद तापते व भाजी लवकर शिजते.

(५) चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते ?

उत्तर : फुंकणीने अग्नीवर फुंकर घातली की त्यातील हवेमुळे चुलीतला जाळ पटकन प्रज्वलित होतो व निखार्यांवर जमलेली राख उडून जाते; शिवाय चूल पेटवताना आपले तोंड जाळापासून दूर राहू शकते.

Leave a Comment