Swadhyay – Seventh -History -Swarajya Sthapana

 स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी  इतिहास  5  –  स्वराज्यस्थापना


Test Link

प्रश्न १. ओळखा पाहू :

उत्तरे

(१) शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण        –             शिवनेरी किल्ला

(२) आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकात जहागीर दिलेले ठिकाण –   बंगळूरू

(३) खेळणा किल्ल्याला शिवरायांनी दिलेले नाव –            विशाळगड

(४) स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव –           राजगड

(५) जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला –     प्रतापगड

(६) आदिलशाहाने सिद्दी जौहरला दिलेला किताब –        सलाबतखान

(७) आदिलशाहीशी झालेल्या तहानुसार शिवरायांनी परत दिलेला किल्ला –     पन्हाळा.

.प्रश्न गटान न बसणारा शब्द शोधा

उत्तरे

(१) पुणे, सुपे, चाकण, बंगळूरू 

(२) फलटणचे जाधव, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे, सावंतवाडीचे सावंत

(३) तोरणा, मुरुबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग

(४) अफजलखान, शायिस्ताखान, सिद्दी जौहर, फाजलखान

(५) येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी घोरपडे, बाजी पासलकर

पुढील घटना कालानुक्रमे लिहा :

(अ) शिवाजी महाराजांची जावळीवर स्वारी

(ब) सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला

(क) शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट

(ड) निजामशाहीचा पाडाव झाला

उत्तर –  

(१) निजामशाहीचा पाडाव झाला

(२) शिवाजी महाराजांची जावळीवर स्वारी

(३) शिवाजी महाराज व अफजलखान यांची भेट

(४) सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला

शहाजी राजांची जहागीर असलेले परगणे

पुणे, सुपे, इंदापूर, चाकण

सुरुवातीच्या काळात शिवरायांनी जिंकलेले किल्ले

तोरणा , मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर

स्वराज्यस्थापनेच्या कार्यास विरोध असणारे सरदार

सावंतवाडीचे सावंत, जावळीचे मोरे, मुधोळचे धोरपडे

प्रश्न  का ते फक्त एका वाक्यात लिहा 

(१) शहाजीराजांनी मुघलांना प्रखर विरोध केला: कारण –

उत्तर : मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये, अशी शहाजीराजांची तीव्र भावना होती.

(২) शिवकालात किल्ल्यांना विशेष महत्त्व होते; कारण –

उत्तर : किल्ला ताब्यात  असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे. 

3)  शिवरायांनी मोरे -घोरपडे -सावंत या सरदारांचा बंदोबरत केला: कारण-

उत्तर : या आदिलशाही सरदारांचा स्वराज्यस्थापनेच्या कार्याला विरोध होता.

(४) आदिलशाहीची कारभारीण बडी साहेबीण हिने अफजलखानास शिवरायांवर चालून जाण्यास सांगितले;कारण .उत्तर : शिवरायांनी आपल्या जहागिरीतील आदिलशाहाच्या ताब्यात असलेले किल्ले घेण्यास सुरुवात केली

(५) शिवरायांनी अफजलखानास ठार मारले; कारण –

उत्तर : अफजलखानाने महाराजांच्या भेटीत त्यांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला.

(६) सिद्दी जौहरचा वेढा उठवण्यात नेतोजी पालकरला यश आले नाही; कारण

उत्तर : सिद्दीच्या सैन्यापेक्षा नेतोजी पालकरकडे खूप थोडे सैन्य होते.

(७) महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले; कारण –

उत्तर : बाजीप्रभू आणि त्याच्या सैन्याने घोडिखिंडीत सिद्दीच्या सैन्याला थोपवून धरले होते.

प्रश्न . चला, लिहिते होऊ या! (थोडक्यात उत्तरे लिहा.)

(१) वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर केलेले विविध संस्कार लिहा.

उत्तर : वीरमाता जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांवर पुढील विविध संस्कार केले (१) शील म्हणजेच शुद्ध चारित्र्य (२) सत्यप्रियता (३) वाक्चातुर्य (४) दक्षता (५) धैर्यं (६) निर्भयता ( ७) शस्त्रप्रयोग (८) विजयाकांक्षा(९) स्वराज्याचे स्वप्न.

(२) शिवाजी महाराजांचे  सवंगडी व सहकारी यांची यादी तयार करा.

उत्तर : स्वराज्यस्थापनेच्या कार्यात शिवाजी महाराजांना त्यांच्या या सरवंगड्यांनी व सहकाऱ्यांनी मदत केली – (१) येसाजी कंक (२) बाजी पासलकर (३) बापूजी मुद्गल (४) नन्हेकर देशपांडे बंधू (५) कावजी कोंढाळकर (६) जिवा महाला (७) तानाजी मालुसरे (८) कान्होजी जेघे (१) बाजीप्रभू देशपांडे (१०) दादाजी नरसप्रभू देशपांडे.

(३) शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसटले?

उत्तर : सिद्दीच्या वेढयातून बाहेर पडणे अशक्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी सिद्दीशी समेटाची बोलणी सुरू केली. त्यामुळे वेढा शिथिल झाला. याचा फायदा महाराजांनी घेतला. त्यांच्यासारखा दिसणारा शिवा काशिद हा तरुण महाराजांची बेशभूषा करून पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाजातून मुख्य रस्त्याने बाहेर पडली. दरम्यान शिवाजीराजे सहकार्यांबरोबर अवधड वाटेने गडाबाहेर पडले व वेढयातून निसटून विशाळगडाकडे गेले.

(४) जावळी जिंकल्याचे शिवाजीराजांना कोणते फायदे झाले ?

उत्तर : स्वराज्यस्थापनेच्या कार्याला विरोध करणार्या चंद्रराव मोरे याचा पराभव करून शिवाजीराजांनी जावळीचा प्रदेश जिंकला. त्याचे त्यांना पुढील फायदे झाले – (१) स्वराज्याचा विस्तार होऊन राजांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. (२) रायगडचा किल्ला त्यांना मिळाला. (3) जावळीची प्रचंड संपत्ती मिळाली. (४) जावळीच्या खोर्यात त्यांना प्रबळ असा प्रतापगड बांधता आला.

प्रश्न . शोधा आणि लिहा : ( कारणे लिहा. )

 (৭) शहाजीराजांना ‘स्वराज्य संकल्पक’ असे म्हणतात.

उत्तर : शहाजीराजे स्वतः श्रेष्ठ राजनीतिज्ञ आणि पराक़रमी होते. दक्षिणेकडील मोठा प्रदेश जिंकल्यामुळे त्याच मोठा दरारा होता. परकीय लोकांच्या सत्ता उलथवन स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची तीव्र इच्छा होता. त्यासाठी शिवरायाना राजा बनण्यासाठी त्यांनी उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. म्हणूनच शहाजीराजांना ‘स्वराज्य संकल्पक असे म्हणतात.

(२) शिवरायांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

उत्तर : शिवरायांनी कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकली. या पश्चिम किनारपट्टीवर सिद्दी, पोतुंगीज व  इंग्रज या परकीय सत्तांची ठाणी होती. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपले प्रबळ आरमार उभारले पाहिजे, याची शिवरायांना जाणीव झाली; म्हणून त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

(३) शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह केला

उत्तर : शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने पाठवलेल्या सिद्दी जौहरने पन्हाळगडाला वेढा घातला होता. त्याच वेळी मुघल सम्राट औरंगजेब याने त्यांच्यावर चाल करण्यासाठी शायिस्ताखानाला पाठवले. वेढ्यातून सुटका करून महाराज विशाळगडावर पोहोचले, त्या वेळी शायिस्ताखानाने पुणे प्रांतावर स्वारी केली. एकाच वेळी आदिलशाही आणि प्रबळ मुघलशाही या दोन सत्तांशी लढा देणे योग्य होणार नाही, हे लक्षात घेऊन शिवरायांनी आदिलशाहाबरोबर तह केला.

(४) शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

उत्तर : पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैॠत्य दिशांचा प्रदेश मावळ भागात येत असे. हा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोर्यांचा असल्यामुळे दुर्गम होता. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागातून केली.

प्रश्न   तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा :

शहाजीराजे.

उत्तर : शहाजीराजे भोसले हे दक्षिण भारतातील निजामशाहीचे मातब्बर सरदार होते. ते पराक्रमी बुदधिमान, उत्तम राजनीतिज्ञ होते. तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात निष्णात होते. परकीय लोकांच्या सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची इच्छा होती, म्हणून त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी आवश्यक ते सर्व शिक्षण देण्याची बंगळूरू येथे व्यवस्था केली होती. आदिलशाहीचे सरदार झाल्यावर त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू येथील बराचसा प्रदेश जिंकून घेतला होता.

वीरमाता जिजाबाई.

उत्तर : लखुजीराजे जाधव या सिंदखेडराजा येथील मातव्बर सरदारांची जिजाबाई ही मुलगी. लहानपणीच लष्करी शिक्षणासह सर्व विद्या त्या शिकल्या होत्या. त्या कर्तबगार आणि दूरदृष्टी असणाऱ्या राजनीतिज्ञ होत्या. शहाजी राजांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले व सतत मार्गदर्शन केले. शिवराय गुणवान, शीलवान आणि उत्तम राज्यकर्ता होण्यासाठी जिजाबाईंनी त्यांच्यावर संस्कार केले.

स्वराज्याची राजमुद्रा.

उत्तर : संस्कृत भाषेत तयार केलेली शिवरायांच्या स्वराज्याची राजमुद्रा महाराजांचे ध्येय स्पष्ट करते. ‘प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि विश्वाने वंदन केले आहे, अशी ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसते असा या राजमुद्रेवर कोरलेल्या ओळींचा अर्थ आहे. या राजमुद्रेवरून शिवरायांचे गुण व संकल्प दिसून येतात. वडिलांविषयी कृतज्ञता, स्वराज्य विस्तारत जाईल याची खात्री, प्रजेचे कल्याण करण्याची प्रतिज्ञा या सर्व बाबी त्यातून व्यक्त होतात.

Leave a Comment