स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इतिहास नागरिकशास्त्र 2 -शिवपूर्वकालीन भारत
प्रश्न १. नावे सांगा :
उत्तरे
৭) गोंडवनची राणी – राणी दुर्गावती
2) उदयसिंहाचा पुत्र – महाराणा प्रताप
3) मुघल सत्तेचा संस्थापक – बाबर
४) बहमनी राज्याचा पहिला सुलतान – हसन गंगू
(५) गुरुगोविंदसिंग यांनी स्थापन केलेले दल – खालसा दल
(६) सिंध प्रांताचा राजा दाहीर याचा पराभव करणारा – मुहम्मदबिन कासिम,
प्रश्न गटांत न बसणारा पर्याय निवडा :
(৭) सुलतान मुहम्मद, कुतुबुद्दीन ऐबक, मुहम्मद घोरी, बाबर.यापैकी – बाबर गटात बसत नाही
(२) आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही यापैकी . – बरीदशाही. गटात बसत नाही
(३) अकबर, हुमायून, शेरशाह, औरंगजेब. यापैकी – शेरशाह. गटात बसत नाही
कालरेषा पूर्ण करा
इ. स. १३३६ -विजयनगर राज्याची स्थापना
इ. स. १३४७ – बहमनी राज्याची स्थापना
इ. स. १५०९ – कृष्णदेवराय विजयनगरचा राजा झाला.
इ. स. १५२६ – मुघल सत्तेची स्थापना
प्रश्न योग्य पर्याय निवडा :
(१) आठव्या शतकातील बंगालमधील प्रसिद्ध राजघराणे . – पाल
(२) पुढीलपैकी कोणत्या राजघराण्याचा समावेश राजपूत घराण्यात होत नाही? – राष्ट्रकूट
(३) पहिल्या तराईच्या लढाईत पृथ्वीराज चौहानने कोणाचा पराभव केला? – मुहम्मद घोरी
(४) होयसळ घराण्यातील कोणत्या राजाने संपूर्ण कनर्नाटक जिंकला? – विष्णुवर्धन
(५) आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे – चोळ
तक्ता पूर्ण करा
उत्तरे
राजसत्ता संस्थापक/प्रमुख राज्यकर्ता राजधानी
१. विजयनगर हरिहर व बुक्क हंपी
२. बहमनी हसन गंगू गुलबर्गा
३. मुघलसत्ता बाबर दिल्ली
४ . यादव पाचवा भिल्लम देवगिरी
यादव राजवटीची वैशिष्ट्ये – मराठी भाषेचा विकास मराठी साहित्याचा सुवर्णकाळ महानुभाव व वारकरी संप्रदायांचा उदय
बहमनी राज्याची शकले – वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही. विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळ-कोंड्याची कुतुबशाही
सुलतान महमुदाने येथील मंदिरे लुटली – मथुरा, वृंदावन, कनोज, सोमनाथ
तालिकोटच्या लढाईत यांनी विजयनगरचा पराभव केला
उत्तर आदिलशाही निजामशाही कुतुबशाही बरीदशाही
प्रश्न . थोडक्यात उत्तरे लिहा:
(৭) विजयनगर व बहमनी ही दोन राज्ये का उदयास आली ?
उत्तर : (१) दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याच्या कारकि्दीत दक्षिणेत त्याच्याविरुद्ध अनेक सरदारांनी उठाव केले. (२) या अस्थिरतेचा फायदा घेऊन हरिहर व बुक्क यांनी १३३६ मध्ये विजयनगरचे राज्य स्थापन केले; तर (३) हसन गंगू या सरदारानेही तुघलकाविरुद्ध बंड करून त्याच्या सैन्याचा पराभव केला व इ. स. १३४७ मध्ये स्वतंत्र बहमनी राज्य स्थापन केले.
२) महमूद गावानने कोणत्या सुधारणा केल्या?
उत्तर : महमूद गावानने राज्यात पुढील सुधारणा केल्या (१) जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. (२) राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. (३) अरबी व फारसी विदर्यांच्या अभ्यासासाठी बिदर येथे मदरसा स्थापन केली. (४) सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. (५) सैन्यामध्ये शिस्त आणली.
(३) मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दुूढ करणे का अशक्य झाले ?
उत्तर : (१) औरंगजेबाच्या मुधल सैन्याने आसामातील आहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. (२) गदाधरंसिंह यांच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. (३) आहोमांनी गनिमी युदधतंत्राचा अवलं केल्यामुळे भुधलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले
प्रश्न- सकारण लिहा :
१) बहमनी राज्याची पाच शकले झाली.
उत्तर : (१) बहमनी राज्याचा वजीर महमूद गावान याच्या मृत्यूनंतर बहमनी सरदारांमध्ये आपापसात गटबाजी वाढिस लागली. (२) याच काळात विजयनगरचे राज्य व बहमनी राज्य यांच्यात चालू असलेल्या संघर्षामुळे है राज्य कमकुवत झाले. (३) त्याचा फायदा धेऊन विविध प्रांतांतील अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागू लागले, बहमनी ज्याचे राज्यकते या अधिकार्यांवर नियंत्रण ठेवू न शकल्यामुळे पुढे बहमनी राज्याची पाच शकले झाली.
(२) राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
उत्तर : राजपूत राजांना एकत्र आणून राणासंगाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली, परंतु (१) बाबराच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाय लागला नाही. (२) बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणासंगाच्या सैन्याचा पराभव झाला.
(३) राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला.
उत्तर : (१) संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अमलाखाली आणण्याचा अकबराचा उददेश होता. (२) राणा प्रतापने याला विरोध करून मेवाडच्या अस्तित्वासाठी अकबराशी संघर्ष चालू ठेवला. (३) त्याचा पराक्रम, धैर्य, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी वृती राज्यासाठी त्याने केलेला त्याग या गुणांमुळे राणा प्रताप इतिहासात अजरामर झाला.
(४) औरंगजेबाने गुरुतेघबहाददरांना कैद केले.
उत्तर : (१) वर्चस्ववादी धोरणातून औरंगजेबाने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. (२) त्याचे धार्मिक धोरणही असहिष्णू होते. या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध शिखांचे नववे गुरू गुरुतेघबहाददर यांनी तीव्र नापसंती दर्शवली. त्यामुळे औरंगजेबाने त्यांना कैद करून पुढे त्यांचा शिरच्छेद केला.
(५) राजपुतांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला.
उत्तर : (१) अकबराप्रमाणे सलोख्याचे धोरण नसल्यामुळे औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. (२) मारवाडचा राणा जसवंतसिंग याच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने त्याचे राज्य मुधल साम्राज्याला जोडून घेतले. (३) दुर्गादास राठोड याने जसवंतसिंगाचा मुलगा अजितसिंह याला मारवाडच्या गादीवर बसवून हे राज्य स्वतंत्र करण्यासाठी मुधलांविरुद्ध दीर्घकाळ संघर्ष केला.
(६) दिल्लीतील सुलतानशाहीचा शेवट झाला.
उत्तर : (१) शेवटचा सुलतान इब्राहीम लोदी याच्या स्वभावदोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. (२) पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी याने इब्राहीम लोदीचा पराभव करण्यासाठी काबूलचा मुधल सत्ताधीश बाबर याला भारतात बोलावले. (३) बाबराच्या तोफखान्यापुढे इब्राहीम लोदीचा टिकाब लागला नाही; त्यामुळे दिल्लीतील सुलतानशाहीचा शेवट झाला.
प्रश्न तुमच्या शब्दांत थोडक्यात माहिती लिहा:
कृष्णदेवराय,
उत्तर : (१) इ. स. १५०९ मध्ये विजयनगरच्या गादीवर आलेल्या कृष्णदेवराय याने विजयवाडा व राजमहेंदरी है प्रदेश जिंकून राज्याचा विस्तार केला. (२) बहमनी सुलतान महमूदशाह याच्या नेतृत्वाखालील सुलतानांच्या सैन्यसंघाचा पराभव केला. (३) विद्वान असलेल्या कृष्णदेवरायाने तेलुगु भाषेत ‘आमुक्तमाल्यदा’ हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला (४) त्याच्या काळातच विजयनगरमधील प्रसिद्ध हजार राम मंदिर व वित्ठल मंदिर यांचे बांधकाम झाले
चांदबिबी.
उत्तर : (१) चांदबिबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशाहची कर्तवगार मुलगी. (२) इ. स. १५९५ मध्ये अकबराच्या मुधल सैन्याने निजामशाहीवर आक्रमण करून अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा घातला, तेव्हा (३) चांदबिबीने या आक्रमणाला धै्यने तोंड देऊन किल्ला लढवला, परंतु (४) निजामशाहीतील सरदारांमध्येच फूट पडून फुटीर सरदारांनीच चांदबिबीला ठार केले, यामुळे मुघलांना किल्ला जिंकता आला.
राणी दुर्गावती.
उत्तर : चंदेल राजपुतांच्या घराण्यातील दुर्गावती गोंडवनची राणी होती. तिने उत्तम रितीने राज्यकारभार केला तिने मुघलांविरुद्ध दीर्घ काळ लढा दिला. पतीच्या मृत्यूनंतर तिने शरण न जाता अकबराशी लढा दिला. या लढाईतच तिचा मृत्यू झाला. तिच्या शौर्यामुळे ती इतिहासात प्रसिद्ध झाली.
कुतुबुद्दीन ऐबक.
उत्तर : मूळचा गुलाम असलेला कुतुबुद्दीन ऐबक आपल्या पराक्रमाने सरदारपदापर्यंत गेला. सुलतान मुहम्मद घोरीने भारतात जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी ऐबकाची नेमणूक केली. घोरीच्या मृत्यूनंतर त्याने या प्रदेशाचा स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली. इ. स. १२०६ ते १२१० पर्यंत तो दिल्लीचा राज्यकर्ता होता.
बाबर.
उत्तर : मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमधील फरघाना राज्याचा राजा असणारा बाबर हा दौलतखान लोदीच्या आमंत्रणावरून भारतावर आक्रमण करण्यासाठी आला. २१ एप्रिल १५२६ रोजी पानिपत येथे त्याची इब्राहीम लोदीशी लढाई झाली. बाबराने भारतात या लढाईत प्रथमच तोफखान्याचा प्रभावी वापर केला. पानिपतच्या या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव होऊन दिल्ली येथे मुघल सत्तेची स्थापना झाली. त्याने मेवाडच्या राणासंगाचाही पराभव केला. इ. स. १५३० मध्ये बाबराचा मृत्यू झाला.
अकबर.
उत्तर : इ. स. १५५६ मध्ये पानिपत येथे झालेल्या लढाईत अकबराने हेमूचा पराभव केला. १६०५ पर्यंत तो मुघल सम्राट होता. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अमलाखाली आणण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. परंतु महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांनी अकबराच्या सत्ताविस्ताराला तीव्र विरोध केला. अखेरपर्यंत ते अकबराला शरण गेले नाहीत. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मात्र मिळवले.