Maharashtratil Pramukh Nadya – Bhima

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – भीमा

महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये भीमा नदीचा समावेश होतो.
उगमस्थान : भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे पुणे
जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये आहे.
भीमा नदीच्या उपनद्या : मुळा, मुठा, इंद्रायणी, माण, घोड, सीना आणि नीरा या भीमानदीच्या
उपनद्या आहेत. या नद्या भीमा नदीला येऊन मिळतात.
भीमा नदीचे खोरे : भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर इत्यादी
जिल्हे येतात.
इतर माहिती : भीमानदी भीमाशंकर येथे उगम पावल्यावर ती पुढे सपाट प्रदेशातून वाहत येते.
ही नदी पूर्ववाहिनी आहे. दक्षिणेकडील महादेवाचे डोंगर व उत्तरेकडील बालाघाटाचे डोंगर
यांच्यामधील प्रदेश हा भीमा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे. भीमा नदीला विविध उपनद्या येऊन
मिळतात; त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद झाले आहे.


भीमा नदीला इंद्रायणी नदी तुळापूरजवळ, तर मुळा व मुठा या नद्या रांजणगावाजवळ येऊन
मिळतात. यानंतर भीमा नदी पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत जाते. पुढे नरसिंहपूर येथे नीरा नदी
भीमेला येऊन मिळते. या ठिकाणाला नीरानरसिंहपूर असे म्हणतात. नीरानरसिंहपूर हे एक
तीर्थक्षेत्र आहे. पुढे भीमा नदी पंढरपूर येथे येते. पंढरपूरजवळ तिचे पात्र चंद्राच्या कोरीसारखे बनते
म्हणून तिला ‘चंद्रभागा’ असेही म्हणतात. या चंद्रभागेच्या तीरावर पंढरपूर येथे पांडुरंगाचे प्रसिद्ध
मंदिर आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भीमा नदीवर उजनी येथे मोठे धरण
बांधले आहे. भीमा नदीचे पाणी उद्योगधंद्यांनासुद्धा पुरवले जाते.
भीमा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून वाहत जाऊन आंध्रप्रदेशात कुरुगुड्डी येथे कृष्णा नदीस मिळते .

📁अभ्यास माझा📝*
पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास
💎 एका क्लिकवर🖱️
https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html
🛡️ समी इंग्रजी माध्यम
💎 Class 5 th to 8 th
Semi English Mathematics and Science Online Test
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉
https://www.studyfromhomes.com/
3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi
https://www.mystudyfromhomes.in/
4️⃣ For Class Seventh Questionnaire
https://abhyasmajha.com/

Education with Technology शैक्षणिक तंत्रज्ञान (https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html)
abhyas majha इयत्ता पहिली ते दहावी – अभ्यास माझा

Leave a Comment