जागतिक औषधविक्रेते दिन
वर्ल्ड फार्मासिस्ट डे दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करुन देणे आणि औषधांच्या सुरक्षित वापरासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा करणे हा आहे. फार्मासिस्ट हे आरोग्य सेवेत महत्त्वाची कडी आहेत. ते औषधे योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे रुग्णांना उपलब्ध करून देतात. औषधांचे दुष्परिणाम, डोस आणि वापर याबाबत ते रुग्णांना सल्ला देतात. याशिवाय, आरोग्य व्यवस्थापनात औषधांचे परीक्षण, वितरण आणि रुग्णांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्याचे काम ते करतात.
वर्ल्ड फार्मासिस्ट डे ही जागतिक फार्मास्युटिकल फेडरेशनने (FIP) 2009 मध्ये सुरू केली होती. यावर्षीचा मुख्य विषय “फार्मासिस्ट्स स्ट्रेंथनिंग हेल्थ सिस्टिम्स” आहे, ज्यामध्ये फार्मासिस्टांच्या कौशल्यांचा, ज्ञानाचा आणि अचूकतेचा महत्त्वपूर्ण वाटा अधोरेखित केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट म्हणजे फार्मासिस्टच्या कामाचे कौतुक आणि त्यांच्याद्वारे समाजाला दिल्या जाणाऱ्या आरोग्यसेवेचे महत्त्व दाखवणे.