General Science |सामान्य विज्ञान – 5 – अन्नपदार्थाची सुरक्षा

स्वाध्यायमाला –     सामान्य विज्ञान – 5  – अन्नपदार्थाची सुरक्षा 

 प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा :


(कॅल्शिअम कार्बाईड, गोठणीकरण, किरणीयन, अन्नबिघाड, अंतःस्थ, अल्युमिनिअम फॉस्फॉइडचा, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, मेलॅथिऑनचा, नैसर्गिक परिरक्षक, सूक्ष्मजीवांची, रासायनिक परिरक्षक)

(1) शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.

(2) दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला असे पाश्चरीकरण म्हणतात.

(3) मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे.

(4) व्हिनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे.

(5) पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजे अन्नबिघाड होय.

(6) अन्नपदार्थांत बदल अंतःस्थ घटकांमुळेच होतात.

(7) परिरक्षणाच्या विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ रोखली जाते.

(8) केळी पिवळी धमक दिसण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईड या रसायनाचा वापर करतात.

प्रश्न 2. पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा व चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा

(1) काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात-  बरोबर

(2) आपल्या देशात व संपूर्ण जगात आता लोक भरपूर अन्न खाऊन झोपी जातात. 

चूक, (आपल्या देशात व संपूर्ण जगात अनेक लोक दररोज अन्नाशिवाय  झोपी जातात.

(3) पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने अन्न वाचते. 

चूक, पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने अन्न वाया जाते

(4) अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही खाजगी यंत्रणा आहे.

चूक – (अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा आहे.)

(5) ताटात घेतलेले सर्व पदार्थ संपवावेत.- बरोबर

(6) द्राक्षे, आंबे यांच्या अयोग्य हाताळणीमुळे संख्यात्मक नासाडी होते.

 चूक.   द्राक्षे, आंबे यांच्या अयोग्य हाताळणीमुळे गुणात्मक नासाड़ी होते

आमच्यातील वेगळा कोण हे शोधा :

(1) मीठ, व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडिअम बेन्झोएट.     – मीठ

(2) लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल यलो, हळद पावडर. –   हळद पावडर

(3) केळी, सफरचंद, पेरू, बदाम. –  बदाम

(4) साठवणे, गोठवणे, निवळणे,सुकवणे.  – साठवणे.

तक्ता पूर्ण करा 

1] उत्तरे –

पदार्थ                  भेसळ

हळद पावडर    मेटॅनिल यलो

मिरी             पपईच्या बिया

रवा             लोहकीस

मध           गुळाचे पाणी

2] उत्तरे –

पदार्थ             भेसळीचे पदार्थ

दूध         –         पाणी, युरिया

लाल तिखट-   विटांची भुकटी

काळे मिरी –  पपईच्या बिया

आइस्क्रीम  –   धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा

प्रश्न  काय करावे बरे ?

(1) बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.

उत्तर : उघड्यावर ठेवलेली मिठाई कघीही खाऊ नये. त्यावर हमखास माश्या बसलेल्या असतात. असे अन्न दूषित असते व त्यामुळे पोटाचे आजार होऊ शकतात. अन्नसुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. त्यासाठी नजीकच्या नगरपालिका कार्यालयात तक्रार करावी. इतर ग्राहकांना अशी दूषित मिठाई घेण्यापासून परावृत्त करावे.

(2) पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.

उत्तर : अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवणाऱ्या पाणीपुरी विक्रेत्याला जागरुक करावे. अस्वच्छतेमुळे कोणते विकार होतील याची जाणीव त्याला करून दयावी. आपण अशा ठिकाणी खाणे टाळावे.

(3) बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत.

उत्तर : बाजारातून भाजीपाला व फळे आणल्यावर ती स्वच्छ करावीत. व्यवस्थित धुवून कोरडी करावीत.त्यानंतर ती रेफ्रिजरेटरच्या भाजी ठेवायच्या कप्प्यात सुरक्षित ठेवावी. फ्रिज नसेल तर टोपलीत किंवा कापडी पिशवीत नीट झाकून ठेवावीत.

(4) उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे.

उत्तर : अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत. जिथे उंदीर व झुरळे फिरकणार नाहीत अशी उंचावरील जागा निवडावी फडताळात किंवा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास अन्नपदार्थ सुरक्षित राहतील.

प्रश्न . पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

(1) दूधाचे पाश्चरीकरण कसे करतात?

उत्तर : पाश्चरीकरण पद्धतीने दूध तापमानापर्यंत 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकते.

(2) भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत ?

उत्तर : भेसळयुक्त अन्नामुळे खाणाच्याच्या आरोग्याला घोका पोहोचतो. अन्नातील येगवेगळ्या भेसळीचे परिणाम शरीरावर होतात. पोटाचे आजार किंवा विषवाधा होऊ शकते. दीर्घकाळपर्यंत भेसळयुक्त अन्न खाल्ल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात . दुर्धर आजार संभवतो.

(3) अन्नरक्षण आणि अन्नपरिक्षण यांतला नेमका फरक कोणता ?

उत्तर : अन्नरक्षण व परिरक्षण यांत पुढोल महत्त्वाचा फरक आहे : (1) अन्नरक्षणात अन्न सुरक्षित ठेवणे है केले जाते. त्यासाठी अन्नाला सूक्ष्मजीवांपासून जपणे, कीड लागू न देणे असे उपाय केले जातात. (2) अन्नपरिरक्षणात वेगवेगळ्या परिरक्षकांचा वापर करून अन्नामध्ये अंतर्गत घटकांमुळे होणारे विधाड टाळले जातात. या पद्घतीने अन्न दीर्घ काळ टिकवले जाते.

(4) अन्नाची संख्यात्मक नासाडी म्हणजे काय ? अशी नासाडी कशामुळे होते ?

उत्तर : (1) अन्नाच्या संख्येत किंवा प्रमाणात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची संख्यात्मक नासाडी होणे. शेती करताना चुकीच्या पद्धती वापरणे. उदा., मुठीने पेरणे, अव्यवस्थित मळणी करणे इत्यादी.(2) अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्घधतांचा वापर करणे, अशाने अन्नाची संख्यात्मक नासाडी होते. (3) इच्छा नसताना अन्न वाढले जाणे. पंगतीसारख्या पारंपरिक जेवण पद्धतीत अनावश्यक आग्रह केल्याने तसेच बफे जेवणात देखील उगाचच ताट भरून घेणे आणि मग फेकून देणे अशामुळे संख्यात्मक अन्ननासाडी होते.

(6) अन्नबिघाड कसा होतो? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते ?

उत्तर : (1) अन्नाचा विघाड अतिशय सहजरीत्या होतो. शेतापासून ते ग्राहकापर्यंत अन्न वाहतूक करतानाच अन्नपदार्थांना इजा पोहोचू शकते. (2) अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. काही नाशिवंत अन्नपदार्थ लवकर खराब होतात. (3) दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारियुक्त असतात.त्यांच्यात अंतःस्थ बदल होत असतात. (4) रासायनिक प्रक्रिया होऊन अन्नपदार्थ विघडतात.  (5) हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा परिसरातले कीटक अन्नामध्ये प्रवेश करतात; त्यामुळे अन्नबिघाड होतो.

(7) अन्नभेसळ म्हणजे काय ?

उत्तर : चांगल्या अन्नपदार्थात त्यासारखेच परंतु स्वस्त अतिरिक्त पदार्थ मिसळणे वाला अन्नाची भेसळ असे म्हणतात. भेसळीचे पदार्थ अशुद्ध आणि हानिकारक असतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे अथोग्य आहे. भेसळयुक्त पदार्थ खाऊ नयेत. अन्नाची भेसळ करणे हा कायघाने गुन्हा आहे.

(8) अन्नाची नासाडी होऊ नये यांसाठी तुमची भूमिका काय असेल?

उत्तर : अन्नाची नासाडी टाळण्यासाठीचे उपाय : (1) आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न ताटात वाढून घेऊ नये. (2) ताटात वाढून घेतलेले सर्व पदार्थ संपवावेत, (3) जास्त वेळ अन्न शिजवू नये. (4) उरलेले अन्न टाकू नये,योग्य पद्धतीने साठवून ते पुन्हा वापरावे. (5) आवश्यक तेवढेच अन्नधान्य, फळे, भाज्या यांची खरेदी करा. अधिक खरेदीचा मोह टाळा. (6) खरेदी करून आणलेले अन्नपदार्थ योग्य पद्धतीने साठवावेत. (7) हवाबंद डबे बाटल्या घेतांना ‘एक्सपायरी डेट’ पाहूनच खरेदी करावी. दिलेल्या तारखेनंतर तो पदार्थ खाण्यायोग्य राहत नाही.

प्रश्न   असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा :

(1) गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.

उत्तर : (1) अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होणे. पुढील कारणांनी अन्नाची गुणात्मक नासाडी होते. (2) अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्घती वापरून अन्नरक्षण करणे.(3) परिरक्षकांचा प्रमाणाबाहेर म्हणजेच अतिरेकी वापर करणे. (4) अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे अशा चुकीच्या पद्धती स्वयंपाक होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, (8)द्राक्षे  आंबे अशा नाशवंत फळांची अयोग्य हाताळणी करणे.

उपाय : ज्या कारणांनी अशी गुणात्मक अन्ननासाडी होते तो कारणे प्रथम शोपून काढावीत. जर स्वयंपाकघरात चुकीच्या पद्धतीने अन्न शिजवणे किंवा अन्नाची साठवणूक होत असेल, तर ती थांबवली पाहिजे. बाजारातून फळे, भाज्या आणताना त्यांची हाताळणी सूयोग्यरीत्या केली पाहिजे.

(2) शिजवलेला भात कच्चा लागत आहे.

उत्तर : भात शिजवताना पुरेसे पाणी त्यात घातलेले नसेल, तर भात कच्चा राहतो.

उपाय : अशा भाताला पुन्हा वाफ काढावी आणि तो खावा. फेकून देऊ नये.

(3) बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.

उत्तर : बाजारातून आणलेला गहू योग्य पद्धतीत साठवलेला नसला की तो दमट आणि ओलसर होऊ शकतो. पावसाळी वातावरणात असे बच्याच वेळा होऊ शकते. आपण बाजारातून आणताना देखील त्याला ओल लागलेली असू शकते.

उपाय : गहू  उन्हात वाळत घालावा. अशा प्रकारे तीन-चार वेळा उन्हात वाळवल्यावर कोरडया, हवाबंद डब्यात भरून ठेवावा.

(4) दहयाची  चव आंबट / कडवट लागत आहे.

उत्तर : दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. कधी कधी जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दहयाची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केली नसेल तरी दही खराब होते.

उपाय : कडवट दही टाकूनच दधावे लागते. आंबट दहयाचे ताक करून किंवा साखर घालून वापरता येते.

(5) खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.

उत्तर : कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया चालू होतात आणि त्यामुळे ते काळे पडते.

उपाय : कापल्याबरोबर लगेच अशी फळे बंद डब्यात झाकून ठेवावीत. त्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर लावला तरी है काळे पडण्याचे प्रमाण कमी होते.

प्रश्न . कारणे लिहा :

(1) 5° सेल्सिअस (5°C) तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.

उत्तर : थंड तापमानात जैविक प्रक्रिया होत नाहीत. जीवाणू, बुरशी असे उपद्रवी सूक्ष्मजीव अन्नावर परिणाम करू शकत नाहीत. म्हणून अन्नपदार्थ 5° सेल्सिअस तापमानाला सुरक्षित राहतात.

(2) सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.

उत्तर : बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण-खाणे प्लेटमध्ये घ्यायचे असते. अन्नाचा अपव्यय होऊ नये म्हणून ही पद्धत सुरू करण्यात आली असावी. पारंपरिक पंगतीच्या भोजनात आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. म्हणून सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्घतीचा वापर करतात.