स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म

सामान्य विज्ञान – 3 – नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म 

(1) हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता हवेच्या आर्द्रता, प्रमाणे ठरते.

(2) पाण्याला स्वतःचा आकार नाही, परंतु निश्चित घनता व वस्तुमान आहेत.

(3) पाणी गोठताना त्याचे आकारमान  वाढते 

(4) उदासीन  मृदेचा pH 7 असतो.

(5) वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो

(6) हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे होय.

प्रश्न  पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) रेताड मृदेची जलधारण क्षमता कमी असते.

बरोबर 

(2) समुद्राचे पाणी विजेचे दुर्वाहक आहे.

चूक  – समुद्राच्या पाण्यात वीजवाहकता असते.

(3) ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात.

बरोबर

(4) हवेमुळे पडणाच्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.

बरोबर

(5) समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 101400 न्यूटन प्रतिचौरस मीटरइतका असतो.

बरोबर

जोड्या जुळवा 

1]  उत्तरे 

(1) हवा – प्रकाशाचे विकिरण

(2) पाणी – उत्सर्जन क्रिया

(3) मृदा- आकार्यता

2] उत्तरे

(1) आम्लयुक्त मृदा –  pH 6.5 पेक्षा कमी

(2) उदासीन मृदा    – pH 6.5 ते 7.5

(3) आम्लारिधर्मी  मृदा-   pH 7.5 पेक्षा जास्त

काय होईल ते सांगा 

प्र –  1] हवेतील बाष्याचे प्रमाण वाढले.

उत्तर : हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले की वातावरणातील आर्द्रता वाढेल. अशी हवा दमट वाटते.

(2) जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले.

उत्तर : जमिनीत सातत्याने एकच पीक घेतले तर जमिनीत असणारी पोषकद्रव्ये कमी होतील. पीक घेताना रासायनिक खते जास्त प्रमाणात वापरली असतील, तर जमिनीचा पोत बिघडेल. जमीन पेरणीयोग्य राहणार नाही. पीक योग्यरीत्या येणार नाही.

(3) रिकामी बाटली बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरली.

उत्तर : बाटलीतली हवा बुडबुड्यांच्या स्वरूपात बाटलीतून बाहेर पडते.

(4) प्रकाशकिरण हवेतील सूक्ष्म कणांवर पडले.

उत्तर : हवेतील सूक्ष्म कण प्रकाशाचे विकिरण घडवून आणतात. प्रकाशकिरण त्यामुळे सर्व दिशेने विखुरतात

(1) डॅनिअल बनोलीने 1726 साली मांडलेले महत्त्वाचे तत्त्व कोणते?

उत्तर : डेनिअल बनोलीने 1726 साली मांडलेले महत्त्वाचे तत्त्व :

 (1) हवेचा वेग वाढला की तिचा दाब कमी होतो. (2) हवेचा वेग कमी झाला. तर दाब वाढतो. (3) एखादी वस्तू हवेमपून गतिमान जात असल्यास, त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाव कमी होतो. त्यामुळे त्या वस्तूच्या आजूबाजूची हवा जास्त दावाकडून कमी दाबाकडे जोराने वाहू लागते.

(2) हवेमुळे प्रकाशाचे विकिरण कसे होते ?

उत्तर : (1) प्रकाशकिरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. (2) हवेमध्ये काही वायू तसेच धूळ, पूर व बाण्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण असते. (3) जेव्हा सूर्यांचे प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म  कणावर पडतात, तेव्हा हा प्रकाश सर्व दिशांनी विखुरतो. अशा रितीने प्रकाशाचे विकिरण होते.

(3) ध्वनीच्या प्रसारणामध्ये हवेचे महत्त्व काय?

उत्तर : (1) ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेची माध्यम म्हणून आवश्यकता असते. (2) आपल्याला कानावर पडणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. (3) हवेच्या माध्यमातूनच ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. (4) हवेचे माध्यम नसेल तर आपण ऐकूव शकणार नाही. म्हणून हवा हीच ध्वनीच्या प्रसारणासाठी महत्त्वाची आहे.

(4) बर्फ पाण्यावर तरंगताना का दिसतो?

उत्तर : पाणी गोठताना त्याचे द्रवातून स्थायुत अवस्थांतर होते. त्या वेळी पाण्याचे आकारमान वाढते व घनता कमी होते. घनरूप बर्फ होताना मूळच्या ट्रवरूप पाण्यापेक्षा हलका होतो. पाण्यापेक्षा बर्फ हलका असल्यामुळे बफ्फाचे खडे पाण्यावर तरंगतात.

(5) पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये का ठेवू नये ?

उत्तर : (1) बर्फ होत असताना पाण्याच्या असंगत वर्तनाप्रमाणे तो प्रसरण पावतो. (2) 4 C तापमानाच्या खाली तापमान गेल्यास पाण्याची घनता कमी होऊ लागते आणि आकारमान वाढू लागते. (3) फ्रीजरमध्ये 4 °C च्या खाली तापमान असल्यामुळे पाणी प्रसरण पावून बाटली फुटू शकते. (4) काचेची बाटली असल्याने तुटक्या काचांनी इजा होईल. म्हणून पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीझरमध्ये ठेवू नये.

(6) पाण्याचे विविध गुणधर्म स्पष्ट करा.

उत्तर : पाण्याचे पुढील गुणधर्म आहेत

(1) प्रवाहिता : पाण्याला प्रवाहिता असल्यामुळे ते जलवाहतुकीसाठी उपयोगी ठरते. जनित्राच्या साहाय्याने वीजनिर्मिती करताना उंचावरून खाली पडणाच्या पाण्याच्या प्रवाहाचा वापर केला जातो. 

(2) उत्तम शीतक : तापलेल्या गाड्यांच्या रेडिएटर्सचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पाणी वापरले जाते.

 (3) वैश्विक द्वावक : पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात. म्हणून त्याला बैश्विक द्रावक असे म्हणतात.द्रावक म्हणून पाण्याचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. उदा.., कारखाने, प्रयोगशाळा, अन्नपदार्थ शिजवताना.

(4) शरीराच्या अंतर्गत होणार्या अनेक जैविक प्रक्रिया. उदा., पचन, उत्सर्जन इत्यादी क्रिया पाण्यामुळेव शक्य होतात.

(5) स्वच्छक : आपल्या जीवनातील रोजची नैमित्तिक कामे पाण्याच्याच मदतीने होतात. अंघोळ करणे, कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे इत्यादींसाठी पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग होतो.

(7) समुद्राच्या पाण्याची घनता पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का असते?

उत्तर : समुद्राच्या पाण्यात बरेच क्षार असतात. त्यामुळे त्या पाण्याची घनता जास्त असते.

(৪) चांगल्या मृदारचनेचे महत्त्व काय आहे ?

उत्तर : (1) मृदेच्या रचनेवर जमिनीचौ सुपीकता अवलंबून असते. चांगली मृदारचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. (2) अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते.

(9) मृदेचे विविध उपयोग कोणते ?

उत्तर : मृदेचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत :

(1) वनस्पती संवर्धन : वनस्पतींच्या वाढीस मदत करणे.

(2) जलसंधारण मृदा पाणी धरून ठेवत असल्यामुळे आपल्याला बारा महिने पाणी मिळू शकते.

(3) आकार्यता मृदेला हवा तसा आकार देता येण्याच्या गुणधर्माला आकार्यता म्हणतात. या गुणधर्मामुळे मृदेपासून आपण विविध आकारांच्या मातीच्या वस्तू बनवू शकतो. या वस्तू भाजून टणक करता येतात. उदा., माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा.

(10) मृदापरीक्षणाची शेतकऱ्यांच्या दुष्टीने गरज व महत्त्व काय आहे?

उत्तर : (1) शेतकर्याला उत्तम पीक काढणे अपेक्षित असते. (2) मूदेचे परीक्षण केल्याने त्याला त्याच्या शेतजमिनीतील विविध घटकांचे प्रमाण लक्षात येते. (3) मृदापरीक्षण केल्यानंतर त्याला मृदेचा रंग, पोत तसेच त्यातील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण समजते. (4) मृदेमध्ये कोणत्या घटकांची कमतरता आहे व ती दूर कशी करावी याचे उपाय कोणते हे मृदापरीक्षणातून समजते. (5) मातीचा pH (सामू) आणि विदधुतवाहकता या दोन परीक्षणांचा शेतकऱ्याला विशेष उपयोग होतो.

(11) मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती?

उत्तर : मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत : (1) मृदेचा सामू आम्लयुक्त (pH 6 पेक्षा कमी) किंवा आम्लारिधर्मी (pH 8 पेक्षा जास्त) असणे. (2) सुपीकता आणणाच्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण कमी होणे. (3) जमिनीतील पाण्याचा निचरा न होणे. (4) पुन्हा पुन्हा एकच पीक घेणे. (5) खाऱ्या पाण्याचा सतत वापर करणे. (6) रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर करणे.

(12) तेलाने माखलेल्या ताटलीत थोडेसे पाणी ओतल्यानंतर ते पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात. असे का होते ? 

उत्तर : तेलकट पृष्ठभागावर पडलेला पाण्याचा थेंब गोलाकार असतो. पाण्याचे रेणू एकमेकांना आकर्षित करून घेतात. मात्र ते तेलाच्या रेणूंपासून निराळे राहतात. त्यामुळे तेल आणि पाणी एकमेकांत मिसळत नाही. म्हणून तेलाने माखलेल्या ताटलीत थोडेसे पाणी ओतल्यानंतर पाणी ताटलीत न पसरता पाण्याचे अनेक छोटे छोटे गोलाकार थेंब तयार होतात.

प्रश्न – असे का म्हणतात? (शास्त्रीय कारणे दघा) :

1) हवा हे वेगवेगळ्या वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे.

उत्तर : हवेत अनेक प्रकारचे वायू व इतर घटक आहेत. हे सर्व मिश्रणाच्या स्वरूपात एकत्र असतात.त्यांच्या एकट्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही, म्हणून हवा है वेगवेगळया वायूंचे एकजिनसी मिश्रण आहे असे म्हटले जाते.

(2) पाण्याला वैश्विक द्रावक  म्हटले जाते.

उत्तर : पाण्यात अनेक प्रकारचे पदार्थ विरघळतात. म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हटले जाते.

(3) स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दुसरा पर्याव नाही.

उत्तर : पाण्यात अनेक पदार्थ विरधळ शकतात. अंधोळ करणे, कपडे व भांडी पुणे अशा कामांकरिता  पाण्याचा स्वच्छक म्हणून उपयोग करणे] सोपे जाते. पाण्यासारखा दुसरा स्वस्त सहज आणि सोपा पर्याय  स्वच्छतेसाठी नाही. म्हणून असे म्हणतात की स्वच्छतेसाठी पाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही.

(4) सिरिंजचा बाहेर खेचलेला दटट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो.

उत्तर : ज्या वेळी सिरिंजचे छिद्र बंद करून आपण दट्ट्या खेचतो, तेव्हा सिरिंजमघल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते. त्यामुळे ती विरळ होते. सिरिंजमधल्या हवेना दाब अशा रितीने कमी होतो. बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असल्यामुळे बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो.

(5) पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो.

उत्तर : सूर्याकडून पृथ्वीला जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा उष्णतेच्या रूपात परत बाहेर, वातावरणात फेकली जाते. पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणातील हवेत बाण्प आणि कार्बन डायऑक्साइड यांसारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात. तो पृथ्वीवरच्या इतर घटकांना देतात. त्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो, थंडी पडली की पहाटे दवबिंदु जास्त प्रमाणात दिसतात.

(6) थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.

उत्तर : आपण सर्व आवाज भोवतालच्या हवेच्या माध्यमातून प्रसारित झाल्यामुळे आपण ते ऐकू शकतो. तापमानातील बदलामुळे हवेची घनता बदलते. थंडीमध्ये हवेची घनता वाढते. त्यामुळे आपल्याला ट्रचे आवाज स्पष्ट ऐकू येतात. म्हणून थंडीत पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.

प्रश्न , जरा होके चालवा :

(1) हवेचे तापमान वाढले की, त्याचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो ? 

उत्तर : कोणतीही हवा एखादया बंदिस्त जागेत असेल, तर तापमान वाढवल्यावर त्यातील दाब देखील वाढेल. वाढलेल्या तापमानामुळे या हवेतील निरनिराळे घटक रेणू जोराने कंप पावतात. त्यामुळे त्यांच्याकरवी हाच दाब वाढतो. मात्र हवा बंदिस्त नसेल, तर जसजसे हवेचे तापमान वाढेल, तसतशी हवा वातावरणाच्या वरच्या थरालासरकेल यामुळे हवेचा दाब कमी होईल.

(2) उन्हाळ्यात ओले कपड़े चटकन वाळतात. पण पावसाळ्यात मात्र ते लवकर बाळत नाहीत. असे का घडते ? 

उत्तर : पावसाळ्यात हवेची आर्द्रता जास्त असते. हवेत आधीच जास्त प्रमाणात ओल्या कपड्यातले बाष्प, बाष्पीभवन होऊन लवकर जात नाही. ओले कपड़े त्यामुळे वाळत नाहीत. उन्हाळ्यात तापमान जास्त असते. हवेची आर्द्रता पण कमी असते. कोरड्या हवेमुळे कपड़े लवकर वाळतात.

(3) आपल्या अवतीभोवतीची सर्व हवा जर काढून टाकली, तर काय होईल?

उत्तर : सजीव हवेवाचून जगू शकणार नाहीत. श्वसन, ज्वलन इत्यादी प्रक्रिया बंद पडतील ध्वनी  प्रसारण, उष्णता,आर्द्रता  अशा बाबी घडणार नाहीत. पृथ्वीवर ऋतू निर्माण होणार नाहीत आणि पाऊसही पडणार नाही. त्यामुळे पाणी नाहीसे होईल. हवेशिवाय सर्व जीवनच नष्ट होईल.

(4) अवकाशात आवाज ऐकू येईल का? 

उत्तर : सर्व प्रकारचे आवाज भोवतालच्या हवेमुळेच आपण ऐकू शकतो. हवा हे ध्वनी प्रसारणाचे माध्यम आहे. अवकाशात हवेचे माध्यम नसल्याने आवाज ऐकू येणार नाही.

(5) अतिथंड प्रदेशात नदी, तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात?

उत्तर : पाण्याच्या असंगत वर्तनामुळे नदी, तलाव वरगरे केवळ वरच्या थरातच गोठतात. अतिथंड प्रदेशात तापमान खूप कमी असते, ते शून्याच्या खाली देखील जाते. अशा वेळी जलाशयाच्या वरच्या थरातले पाणी थंड होत जाते. पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा 4°C पेक्षा कमी होते, तेव्हा त्याची घनता कमाल होते. या जास्त घनतेमुळे पाणी खालच्या थराकडे सरकू लागते. त्यामुळे खालच्या थरातले पाणी वरच्या बाजूला सरकते. हे पाणी पुन्हा 4 °C या तापमानाला जाते व पुन्हा जास्त घनतेचे झाल्यामुळे खाली उतरते. जसे तापमान आणखी उतरते तसे जलाशयाचा वरचा पृष्ठभाग 0°C तापमानाला जातो. अशा अवस्थेत पृष्ठभाग गोठतो मात्र खालच्या थराचे पाणी 4°C तापमानालाच द्रवरूपात राहत असल्याने तेथे जलचर सुरक्षित राहतात. पृष्ठभागावरचा बर्फाचा थर असल्याने बाहेरची थंड हवा जलाशयाच्या खालच्या थरात पोहोचत नाही.

(6) चिकण मृदेला ‘मशागतीला जड’ मृदा असे का म्हणतात? 

उत्तर : चिकण मृदेमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वांत जास्त असते. त्या कणांना स्पर्श केला तर ते हाताला चिकटून बसतात. या मातीत जरुरीपेक्षा जास्त पाणी अडकून राहते. त्यामुळे चिकण मृदा ‘मशागतीला जड’ मृद ठरते.

(7) रेताड मृदेला ‘मशागतीला हलकी’ मृदा असे का म्हणतात? 

उत्तर : रेताड मृदेत वाळूचे आणि मोठ्या कणांचे प्रमाण सर्वांत अधिक असते. त्यामुळे पाण्याचा येथून जलद निचरा होतो. मातीचे कण पाण्यात विरघळत नाहीत. अशा मातीचे थर वरखाली करणे कठीण पडत नाही.त्यामुळे सहज मशागत करता येते. म्हणून रेताड मृदेला ‘मशागतीला हलकी’ मृदा असे म्हणतात.

(৪) पोयटा मृदेची जलधारण क्षमता कशी असते? 

उत्तर : पोयटा मृदा मध्यम आकाराच्या करणांची असते. याची जलधारण क्षमता जास्त असते. गाळाची मृदा’ असेही म्हणतात. पोयटा आणि चिकण मातीच्या मिश्रणात जास्त जलधारण क्षमता असते. 

(9) कोणती मृदा पिकांसाठी योग्य आहे ? का

उत्तर : चिकण मृदा, थोडी रेताड मृदा आणि पोयटा यांचे योग्य मिश्रण शेतीसाठी चांगले ठरते. चिकण मुदा चांगल्या जलधारण क्षमतेची असते. पोयटा मृदेत अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात असतात याच मृदेत सेंद्रिय पदार्थ जास्त प्रमाणात मिसळले की त्याची सूपीकता अधिक वाढते.

Leave a Comment