कृष्णा
कृष्णा नदी ही महाराष्ट्राची एक महत्त्वाची आणि मोठी नदी आहे.
उगमस्थान : कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो.
कृष्णा नदीच्या उपनद्या : कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा, येरळा या कृष्णा नदीच्या उपनद्या
आहेत.
इंद्रायणी नदीचे खोरे : महाराष्ट्रातील सातारा आणि सांगली हे जिल्हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात
येतात.
इतर माहिती : कृष्णा नदी ही महाराष्ट्रातील एक मोठी नदी आहे. ही नदी महाबळेश्वर येथे
उगम पावल्यावर सातारा व सांगली जिल्ह्यांतून कर्नाटक व आंध्र प्रदेशातून पुढे बंगालच्या
उपसागराला मिळते.
प्रारंभी अरुंद असणारी ही नदी वाई या तीर्थक्षेत्राजवळ बरीच रुंद आणि संथ बनली आहे.
कन्हाड या शहराजवळ कृष्णा व कोयना या नद्यांचा प्रीतिसंगम होतो. पुढे सांगलीजवळ कृष्णा
नदीला वारणा नदी मिळते. तसेच कोल्हापूरजवळून वाहणारी पंचगंगा नदी कृष्णा नदीला
नृहसिंहवाडीजवळ येऊन मिळते.
कृष्णा नदीच्या काठावर वाई, क-हाड, सांगली ही प्रसिद्ध शहरे आहेत. कृष्णा नदीला
गावोगावी घाट बांधलेले आहेत.
कृष्णा नदीमुळे सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील बरीच जमीन सुपीक बनली आहे. या
जमिनीत विविध प्रकारची पिके घेतली जातात. कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांचे पाणी
सिंचनासाठी आणि उद्योग-व्यवसाय तसेच पिण्यासाठीही वापरले जाते. कृष्णा नदीमुळे सातारा
आणि सांगली तसेच आसपासच्या प्रदेशाची औद्योगिक भरभराट झालेली आहे. त्यामुळे कृष्णा
नदीला सातारा आणि सांगली जिल्ह्याची वरदायिनी असे म्हणतात.
महाराष्ट्रात सुमारे २८७०० चौ. किमी. क्षेत्रात कृष्णा नदीचे खोरे पसरलेले आहे. पूर्वेला
शंभू महादेवाचे डोंगर व पश्चिमेला सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे विस्तारलेले
आहे. कृष्णा नदीच्या विविध उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळामुळे हे खोरे सुपीक बनले आहे.