महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – वैनगंगा
महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये वैनगंगा नदीचा समावेश होतो.
उगमस्थान : वैनगंगा नदी मध्यप्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांतील छिंदवाडा येथे उगम पावते.
नंतर ही नदी महाराष्ट्राच्या विदर्भ भागात येते.
वैनगंगा नदीच्या उपनद्या : बावनथरी, कन्हान, चुलबन या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. या
नद्या वैनगंगा नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.
वैनगंगा नदीचे खोरे : वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातून वाहते. वैनगंगा नदीच्या
खोऱ्यामध्ये भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर हे जिल्हे येतात.
वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील तलाव : नवेगाव, शिवनी, घोडाझरी, असोलमेंढा, चोरखमारा
तसेच बांदलकसा हे मोठे तलाव वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत.
राष्ट्रीय उद्याने : वैनगंगा नदीच्या खोऱ्यात नवेगाव व ताडोबा ही राष्ट्रीय उद्याने आहेत.
इतर माहिती : मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांत छिंदवाडा येथे उगम पावलेली वैनगंगा
नदी दक्षिणवाहिनी बनते. भंडारा जिल्ह्यात तिला बावनथरी ही नदी येऊन मिळते. पुढे नागपूर
जिल्ह्यातून येणारी कन्हान ही उपनदी मिळते. अंभोरा येथे वैनगंगा, कन्हान व आंब या नद्यांचा
त्रिवेणी संगम होतो.
त्रिवेणी संगमानंतर वैनगंगेला वर्धा नदी येऊन मिळते. नंतर वैनगंगा नदीला ‘प्राणहिता नदी’
म्हणतात. वैनगंगेच्या खोऱ्यात भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर हे जिल्हे येतात. या भागात गोंड
आदिवासी लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. या आदिवासींसाठी वैनगंगा नदी विशेष महत्त्वाची
आहे; कारण त्यांचे जीवन या वैनगंगा नदीमुळे सुसह्य झाले आहे. विदर्भ विभाग वैनगंगा नदीवर
मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. वैनगंगा नदीमुळे तिच्या आसपासचा प्रदेश सुपीक बनला
आहे. वैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड जवळ ‘सहस्रकुंड’ नावाचा मोठा धबधबा
आहे.