महाराष्ट्रातील प्रमुख नद्या – गोदावरी
महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश होतो.
उगमस्थान : नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी पर्वतात गोदावरी नदीचा उगम होतो.
गोदावरी नदीच्या उपनद्या : मांजरा, प्राणहिता, प्रवरा, सिंदफणा, दुधना, दारणा, कादवा, पूर्णा
या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या गोदावरी नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.
गोदावरी नदीचे खोरे : गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये नाशिक, नगर, औरंगाबाद, नांदेड इत्यादी
जिल्हे येतात.
इतर माहिती : गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील एक पवित्र आणि प्रमुख नदी आहे. ही नदी
नाशिक परिसरातून व मराठवाड्यातून वाहत पुढे आंध्र प्रदेशात जाते. महाराष्ट्रामध्ये गोदावरी
नदीची लांबी ६६८ किलोमीटर आहे. गोदावरी नदी नाशिकच्या पंचवटीला वळसा घालून पुढे
जाते. पुढे गोदावरी नदी नांदेडकडे वाहत जाते.
उगमाच्या ठिकाणी गोदावरी नदीचे पात्र बरेच अरुंद असले तरी तिला जसजशा उपनद्या
येऊन मिळतात तसतसे तिचे पात्र बरेच रुंद होत जाते. गोदावरी नदीच्या काठी नाशिक, पैठण, ही
तीर्थक्षेत्रे आहेत. तसेच नांदेड हे शहरही गोदावरी नदीच्या काठी आहे. नाशिक येथे गोदावरी
नदीच्या काठी अनेक घाट बांधलेले आहेत.
गोदावरी नदीला नांदूर-मधमेश्वर येथे कादवा नदी येऊन मिळते. तेथे पक्ष्यांसाठी अभयारण्य
निर्माण केले आहे. गोदावरी नदीवर पैठणजवळ जायकवाडी हे मोठे धरण बांधले आहे. या
धरणापासून कालवे काढून मराठवाड्यातील शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. तसेच
नाशिक, नगर, नांदेड, औरंगाबाद, बीड, परभणी या भागांत या धरणातील पाणी पिण्यासाठी
पुरवले जाते.
गोदावरी नदीच्या खोऱ्यातील जमीन सुपीक बनली आहे. त्यामुळे या खोऱ्यात विविध
प्रकारची पिके घेतली जातात. गोदावरी नदीला ‘महाराष्ट्राची वरदायिनी’ तसेच ‘दक्षिण भारताची
गंगा’ असे म्हणतात.
पहिली ते दहावी मराठी माध्यम, सेमी इंग्रजी माध्यम,शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा सराव-अभ्यास*
💎 एका क्लिकवर🖱️
https://www.dnyaneshwarkute.com/2021/10/abhyas-majha.html
🛡️ समी इंग्रजी माध्यम
💎 Class 5 th to 8 th
Semi English Mathematics and Science Online Test
https://www.dnyaneshwarkute.com/p/6-8-semi-english.html
1️⃣ Class 1 st to 4 th with Esaay & Moral stories 👉
https://www.studyfromhomes.com/
3️⃣ Class 9 th & 10 th with Grammar -English ,Marathi & Hindi
https://www.mystudyfromhomes.in/
4️⃣ For Class Seventh Questionnaire
https://abhyasmajha.com/