5 वी शिष्यवृत्ती भाषा 1- नाम अभ्यास व चाचणी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा1- नाम कोणत्याही दृश्य-अदृश्य, सजीव-निजीव वस्तूच्या नावाला नाम म्हणतात ◆ नामे वाचा  लक्षात ठेवा : ● फुलांची नावे : गुलाब, मोगरा, चाफा, जाई, चमेली, कमळ इत्यादी. ● फळांची नावे : आंबा, चिकू, पेरू, अननस, कलिंगड, पपई इत्यादी ● पक्ष्यांची नावे : कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, कोंबडा, मोर इत्यादी.● वन्य पशूंची नावे : वाघ, सिंह, गाढव, हत्ती, जिराफ, कोल्हा इत्यादी.● पाळीव पशूंची नावे : गाय, बैल, घोडा, बकरी, म्हैस, कुत्रा, मांजर इत्यादी.● नदयांची नावे : गंगा, यमुना, गोदावरी, कावेरी, नर्मदा, सिंधू इत्यादी. ● पर्वतांची नावे : हिमालय, सह्याद्री, सातपुडा, अरवली, विध्य इत्यादी.● वस्तूंची नावे : पुस्तक, वही, पेन, घड्याळ, दिवा, टेबल इत्यादी. ●मुलांची नावे : अजय, दीपक, विजय, संदीप, अमर, सुनील इत्यादी. ●मुलींची नावे : सरिता, नलिनी, श्यामला, दीपाली, मेघना, लीना इत्यादी. ●देशांची नावे : भारत, श्रीलंका, कॅनडा, चीन, अमेरिका, मलेशिया इत्यादी. ●धान्यांची नावे : गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ, मका इत्यादी. ●ग्रह, नक्षत्रे व ताऱ्यांची नावे : सूर्य, चंद्र, पृथ्वी, रोहिणी, मंगळ इत्यादी. ●काल्पनिक नावे : अमृत, स्वर्ग, परी, परीस, राक्षस, देवदूत इत्यादी. ●गुणांची नावे : सुंदरता, स्वच्छता, दयाळूपणा, शौर्य नम्रता, औदार्य इत्यादी. ●मनाच्या स्थितीची नावे : आनंद, कौतुक, दुःख, ममता, हास्य इत्यादी. ●ऋतूंची नावे : वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, ●झाडांची नावे : आंबा, फणस, पेरू, जांभूळ, चिच, शेवगा, खैर, साग, बाभूळ, उंबर इत्यादी. ●कीटकांची नावे : डास, माशी, फुलपाखरू, नाकतोडा, मधमाशी इत्यादी. ●राज्यांची नावे : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान  ●जिल्हयांची नावे : सातारा, सांगली, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, बीड, लातूर, धुळे, रলাगिरी ●डाळींची नावे : मूगडाळ, तूरडाळ, मसूर डाळ, उडीद डाळ इत्यादी. ●महिन्यांची नावे : आषाढ, चैत्र, वैशाख, श्रावण डिसेंबर, मे, जून, ऑक्टोबर इत्यादी.

Leave a Comment