5- लिंग खालील वाक्य अभ्यासा
ज्या नामावरून ते पुरुष जातीचे (नर) आहे की स्त्रीजातीचे आहे, हे आपल्याला कळते त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात.
ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो. ते पुल्लिंग असते.
ज्या नामावरून ते नाम स्त्रीजातीचे आहे हा बोध होतो. ते स्त्रीलिंग असते.
ज्या नामावरून पुरुषजातीचा किंवा स्त्रीजातीचा बोध होत नाही, ते नपुंसकलिंग असते.
पुढील वाक्यांतील ठळक नामे पाहा :(1) रमेश मैदानात आला.
(2) तिची वही हरवली.
(3) बागेत फुले उमलली
वरील वाक्यांतील ‘रमेश, वही, फूले’ ही नामे आहेत.
आता या नामांचे लिंग बघूया
रमेश तो- रमेश पुल्लिंग
वही ती -वही स्त्रीलिंग
फूल ते-फूल नपुंसकलिंग
* लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे.
* बहुवचन किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही ते नाम एकवचनी करूनच ( म्हणजे तात्पुरता आदर
कादून) त्याचे लिंग ओळखावे.
पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या शब्दाने केला जातो.
स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या शब्दाने केला जातो.
नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या शब्दाने केला जातो.
उदा., तो घोडा, तो फळा, तो ढग, तो चांगुलपणा – पुल्लिंी नामे
ती नदी, ती मुलगी, ती लेखणी, ती हुशारी स्त्रीलिंगी नामे
ते मूल, ते फूल, ते शेत, ते धैर्य नपुंसकलिंगी नामे(1) काही पुल्लिगी स्त्रीलिंगी रूपे ठरावीक पद्धतीने होतात.
पु. स्त्री.
माळी माळीण
कुत्रा – कुत्री
वाघ वाघीण
देव देवी
पाटील पाटलीण
बालक बालिका
तरुण तरुणी
चिमणा चिमणी
लेखक लेखिका
कोकीळ – कोकिळा
कोळी – कोळीण
आजोबा – आजी
शिक्षक शिक्षिका
गायक गायिका
गवळी गवळण
सासरा सासू
राजा राणी
पती पत्नी
पुल्लिंगी नामे स्त्रीलिंगी नामे नपुंसकलिंगी नामे
तो आंबा ती पपई ते केळे