5 वी शिष्यवृत्ती गणित 1- आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे अभ्यास व चाचणी

देवनागरी लिपीतील संख्याचिन्हे१   २    ३     ४    ५    ६     ७     ८     ९                                     आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे      1    2     3     4    5   6     7     8     9
रोमन संख्याचिन्हे   I     V      X      L      C      D      M
आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे                    1     5     10     50   100   500 1000


(1) I व X यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करूनसंख्या मिळते.
2) I व X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात. V हे चिन्ह एकापुढे एकलिहीत नाहीत.
(3) I किंवा V यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवली जाते.
(4) I हे चिन्ह V किंवा X च्या डावीकडे लिहिले, तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात.
[टीप : (अ) I हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे एकदाच लिहिता येते. (ब) V हे चिन्ह मोठ्या संख्येच्या डावीकडे लिहीत नाहीत.]
(5) दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 5, 1 अशा गटांत विभागून, वरील नियमांनुसार लहान किंवा मोठे संख्याचिन्ह वापरून लिहितात.

Leave a Comment