8 – गचकअंधारी
वादळी पावसाची वैशिष्ट्ये
(१) विजांचा कडकडाट (२) गारपीट
शब्दजाल पूर्ण करा :
वादळाच्या तडाख्यात सापडलेला
वाघ
वाघ इथे उभा राहिलापडक्या खिंडारात भिंतीलगत
उताऱ्यात आलेले समानार्थी दोन शब्दआसरा , आश्रय
प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा(१) सदा मडकी विकृन येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.उत्तर : सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लाटून ती विकायला शेजारच्या गावी जात असे जी महकी शिल्लकराहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे. म्हाून सदा महकी विकूनयेताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
(२) गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.उत्तर : सदाने वाघासिंहाला खाणाऱ्या गरचक अंधारीची भीती गज्याला दाखवल्यामुळे गज्याने वडिलांसोबतजाण्याचे नाकारले.
(३) वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.उत्तर : सदा गाढव समजून वाघावर बसला होता. परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंघारीबसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलोआहे, हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले, तो थाडथाड उडू लागला. ही छेटळाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुण्पट हलू लागला,
(४) सदा आकाशाकडे पाहता करुणा भाकू लागला.उत्तर : वाघाच्या पाठीवर आपण बसलो है जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी, म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
खालील मुद्यावर माहिती लिहा १) सदाचा व्यवसायउत्तर : (१) सदाचा गाडगी मडकी बनवण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. गाढवाच्या पाठीवर मटकीलादून तो शेजारच्या गावी बाजारात जात असे. उरलेली मडकी ओळखीच्या धरी ठेवून सदा गाढवावर बसून येतअसे.
(२) सदाचा मुलगा गजाननसदाला गजानन नावाचा मुलगा होता. एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचाहट्ट धरला. त्याच वेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला. त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्याघराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता.
(३) सदाची झालेली फजितीगाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला. वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला. सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचकअंधारीबद्दल कळले होते. तिची भीती वाघाच्यामनात होती. सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचकअंधारीच बसली आहे. म्हणून वाघ भयंकर घाबरला होता
(४) सदाने स्वतःची केलेली सोडवणूकसदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे, हे कळले तेव्हा तोही खुप घाबरला.अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोषांचीही घाबरगुंडी उडाली. या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशीकरून घ्यावी या विचारात होता. तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागताच सदाने लोबकळणारी पारंबीपकडली व सरसर झाडावर तो चढून गेला. पाठीवरून गचकअंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला.
प्रश्न – कोण, कोणास व का म्हणाले ?
(१) “कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा ” असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. सदाला आपला मुलगा गज्या याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गज्याला वाघाची भीती दाखवत होताहे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना म्हणाला.
(२) “या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंघारी भेटली न म्हनु नोको मले ” असे सदा गजानन सदाला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता. सदाने त्याला कोल्हा. लांडगा व वाघाची भीती दाखवली. पण गज्या ते जुमानत नव्हता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले
३) ‘गचकअंधारी झटके देऊन रायली,‘ असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला जेव्हा आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले, तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे कृत्य असावे, म्हणून वाघ स्वत:शी हे वाक्य म्हणाला.
(४) ‘गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती,’ असे वाघ स्वत:च्या मनाशी म्हणाला.पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वत:ची सुटका करून घेतली, तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारीआपोआप गेली; म्हणून घाबरलेला वाघ असे स्वत:शीच म्हणाला.
प्रश्न – हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग लिहा.उत्तर : प्रसंग १ : गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा जेव्हा त्याला कोल्हा, लांडगा व वाघाची भीतीदाखवत होता व अखेरीस त्याने गचकअंधारीची भीती दाखवली. या प्रसंगी खूप हसायला येते.प्रसंग २ : सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून वाघही घाबरतो, त्या प्रसंगी हसू फुटते.प्रसंग ३ : सदाला जेव्हा कळते की आपण गाढवाच्या नव्हे; तर वाघाच्या पाठीवर बसलोय तेव्हाची त्याचीस्थिती नजरेसमोर येऊन हसू येते. वाघ आणि सदा दोघांचीही फजिती होते.
प्रश्न – पुढील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा :ज्यास कोणी शत्रू नाही, असा. -अजातशत्रूमोफत पाणी मिळण्याचे ठिकाण. –– पाणपोईधान्य साठवण्याची जागा. – कोठारदुसर्याच्या मनातले ओळखणारा. – मनकवडाडोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता. – बोगदा
वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा :(मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, सुसाट पळत सुटणे, शंकेची पाल चुकचुकणे.)
(१) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला.(२) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.(३) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला.(४) पोलिसांना बघून चोर सुसाट पळत सुटला.
(१) ‘गचकअंधारी’ हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.
नमुना उत्तर :गचकअंधारी हे पात्र काल्पनिक आहे. गजानन आपल्याबरोबर बाजारात येऊ नये, असे सदाला वाटत होते.त्यामुळे सदाने गजाननला भीती वाटेल, असे ‘गचकअंधारी’ हे काल्पनिक पात्र उभे केले, जेणेकरून गजाननयेण्याचे टाळेल. गचकअंधारी हे खरे पात्र असते, तर स्वतः सदा घाबरला असता. म्हणून ‘गचकअंधारी’ हेपात्र काल्पनिक आहे.
(२) पाठाच्या दृष्टीने ‘गचकअंधारी ‘ या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.उत्तर : ‘गचकअंधारी’ हे पात्र लेखकांनी निर्माण केल्यामुळे पाठ विनोदी होण्यात खुप मदत झाली.गचकअंधारी काल्पनिक पात्र आहे; परंतु कथेतोल सदा, गज्या व वाघाला ते खरे वाटते. त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण झाले आहेत. ‘गचकअंधारी ‘मुळे कथेतील अद्भुतरम्यता शेवटपर्यंत टिकून राहते. म्हणून ‘गचकअंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते.