स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे इयत्ता सातवी भूगोल 6 – नैसर्गिक प्रदेश
गाळलेल्या जागी कंसांतील योग्य पर्याय लिहा :
उत्तरे :
(१) हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे.
(२) भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो.
(३) उष्ण वाळवंटी प्रदेशात निवडुंग ही वनस्पती प्रामुख्याने आढळते.
प्रश्न . पुढील विधाने लक्षपूर्वक वाचा. चूक असल्यास विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :
(৭) पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही नसतात.
उत्तर : चूक. पश्चिम युरोपीय प्रदेशांतील लोक सौम्य व उबदार हवामानामुळे उत्साही असतात.
(२) प्रेअरी प्रदेशाला जगातील गव्हाचे कोठार’म्हणतात.
उत्तर : बरोबर,
(३) भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड़ असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते.
उत्तर : चूक, भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने मेणचट असतात आणि झाडांची साल फार जाड असते. झाडांतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात ‘उंट’ हा महत्त्वाचा प्राणी आहे, कारण तो अन्नपाण्याशिवाय दीर्षकाळ राहतो, तसेच तो वाहतुकीसाठी उपयोगी आहे.
उत्तर : बरोबर.
(५) वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशांत जास्त आढळतात.
उत्तर : चूक. वाघ, सिंह यांसारखे मांसभक्षक प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ ( सुदान) प्रदेशात जास्त आढलतात.
प्रश्न . पूढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा :
(१) शीत पट्ट्यातील नैसर्गिक प्रदेश कोणते ?
उत्तर : टुंड़ा प्रदेश व तैगा प्रदेश है शीत पट्यातील नैसर्गिक प्रदेश होत.
(२) गवताळ प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या जमातीचे लोक राहतात?
उत्तर : गवताळ प्रदेशात प्रामुख्याने झुलू, हौसा, मसाई इत्यादी जमातीचे लोक राहतात.
(३) त्से-त्से माश्या प्रामुख्याने कोणत्या प्रदेशात आढळतात?
उत्तर : त्से-त्से माश्या प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात आढळतात.
(४) उष्ण वाळवंटी प्रदेशात कोणत्या ठिकाणी शेती केली जाते ?
उत्तर : उष्ण वाळवंटी प्रदेशात मरूदधाने व नदयांची खोरी या ठिकाणी शेती केली जाते.
(५) भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतींचा विकास झाला ?
उत्तर : भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक य रोमन संस्कृतींचा विकास झाला.
(६) तैगा प्रदेशाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे ?
उत्तर : तैगा प्रदेशाचा विस्तार सुमारे ५५ ते ६५’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे.
प्रश्न. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा :
(१) सुदान प्रदेशातील कोणतेही तीन तृणभक्षक प्राणी सांगा. त्यांच्या स्वसंरक्षणासाठी निसर्गाने कोणती व्यवस्था केली आहे ?
उत्तर : (अ) सुदान प्रदेशातील तीन तृणभक्षक प्राणी : जिराफ, झेब्रा, कांगारू.
(ब) स्वसंरक्षणासाठी निसर्गने केलेली व्यवस्था : सुदान प्रदेशातील तृणभक्षक प्राण्यांना निसर्गाने चपळ पाय दिले आहेत. मांसभक्षक प्राण्यांनी शिकारीसाठी हल्ला केला असता, तृणभक्षक प्रायांना त्यांच्या चपळ पायांनी मासभक्षक प्राण्यांपासून अत्यंत वेगात दूर पळणे शक्य होते व त्यामुळे त्यांना स्वतःच्या जीवाचे रक्षण करता येते.
(२) मोसमी प्रदेशांखाली दिलेली वैशिष्टये कोणती?
उत्तर : मोसमी प्रदेशांखाली दिलेली महत्वाची वैशिष्टे पुढीलप्रमाणे होत :
(१) हवामानाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात उन्हाल्यातील सरासरी तापमान सुमारे २७’ से. ते ३२’ से असते. हिवाळयातील तापमान सुमारे १५ से ते २४ से असते. मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वारयापासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण सरासरी २५० ते २५०० मिमी असते. या प्रदेशात पावसाचे असमान व अनिश्चित वितरण आढळून येते
(२) नैसर्गिक वनस्पतींशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात पानझडी व निमसदाहरित वने आढळतात. या प्रदेशात पावसाच्या वितरणानुसार वनस्पती प्रकार दिसून येतात.
(३) मानवी जीवनाशी संबंधित वैशिष्ट्ये : मोसमी प्रदेशात अनेक लहान लहान असंख्य खेडी आढळतात. या प्रदेशातील लोकांच्या अन्नात व पोशाखात विविधता आदळते. या प्रदेशातील बहुतांश लोकसंख्या प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायांत गुंतलेली आढळते. या प्रदेशातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
(३) मोसमी प्रदेशाचे स्थान सांगा. या प्रदेशात प्रामुख्याने कोणत्या भूभागांचा समावेश होतो?
उत्तर : (अ) मोसमी प्रदेशाचे स्थान : मोसमी प्रदेशाचे स्थान हे विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस १०° ते ३०° अक्षृत्तांच्या दरम्यान आहे. (ब) मोसमी प्रदेशात समाविष्ट होणारे भूभाग : मोसमी प्रदेशात प्रामुख्याने भारत, फिलिपाइन्स, वेस्ट इंडिज, उत्तर ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका, मध्य अमेरिका इत्यादी भूभागांचा समावेश होतो.
(४) मोसमी प्रदेशातील प्राणिजीवनाची माहिती लिहा.
उत्तर : (१) मोसमी प्रदेशात विविध प्रकारचे प्राणी व पक्षी आढळतात. (२) या प्रदेशात प्रामुख्याने वाघ, सिंह, बिबट्या, हत्ती, लांडगे, रानडुकरे, माकडे, साप इत्यादी वन्य प्राणी आढळतात. याशिवाय गाई, म्हशी, शेळया, घोडे हे पाळीव प्राणी आढळतात. (३) याशिवाय मोर, कोकीळ इत्यादी वन्य पक्षी आढळतात.
(५) वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत का आढळत नाहीत ?
उत्तर : (१) वाघ, सिंह यांसारखे प्राणी तृणभक्षक प्राण्यांची शिकार करतात. तृणभक्षक प्राणी हे प्रामुख्याने मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. परिणामी वाघ, सिंह यांसारखे प्राणी मोसमी प्रदेशात व गवताळ प्रदेशांत मोठ्या प्रमाणावर आढळतात. (२) विषुववृत्तीय वनांमध्ये खूप उंच वृक्ष आढळतात व येथे गवताचे प्रमाण कमी असते. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात तृणभक्षक प्राणी आढळत नाहीत. त्यामुळे वाघ, सिंहासारखे प्राणी विषुववृत्तीय वनांच्या प्रदेशांत आढळत नाहीत.
(६) नैसर्गिक साधनसंपत्तीच्या सुयोग्य वापराविषयी माहिती लिहा.
उत्तर : (१) वेगवेगळ्या नैसर्गिक प्रदेशांत विविध प्रकारचे पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध असते (२) नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा त्या त्या प्रदेशांतील विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून असतो (३) त्याचप्रमाणे त्या प्रदेशाचा इतिहास व सांस्कृतिक जडणघडण यांचाही नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर व परिणामी तेथील लोकजीवनावर प्रभाव असतो. (४) नैसर्गिक साधनसंपत्तीवर केवळ मानवाचेच नव्हे तर पृथ्वीवरील इतर सर्वच सजीवांचे जीवन अवलंबून असते. (५) त्यामुळे नैसर्गिक प्रदेशातील साधनसंपत्तीचा वापर करताना आपल्याबरोबरच इतर सजीवांचा देखील विचार करणे आवश्यक आहे.
प्रश्न . पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा :
(৭) मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
उत्तर : (१) मोसमी प्रदेशात नैॠ्रत्य मान्सून वान्यांपासून ठरावीक ऋतूंत पाऊस पडतो. या प्रदेशात सरासरी २५० ते २५०० मिमी पाऊस पडतो. (२) या प्रदेशात उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७° से ते ३२’ से असते व हिवाळ्यातील तापमान सुमारे १५’ से ते २४” से असते. मोसमी प्रदेशातील ही पजन्याची व तापमानाची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात.
(२) विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात.
उत्तर : (१) विषुववृत्तीय प्रदेशात वार्षिक सरासरी तापमान २७ से व उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ३०° से असते. (२) या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो व पावसाचे प्रमाण हे सरासरी २५०० ते ३००० मिमी असते. (३) या प्रदेशात सूर्यकिरणे लंबरूप पडतात. भरपूर सूर्यप्रकाश व भरपूर पाऊस या वैशिष्ट्यांमुळे या प्रदेशातील वनस्पती झपाटयाने व दाटीवाटीने वाढतात. (४) परिणामी जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी विषुववृत्तीय वनांतील वृक्ष उंच वाढतात.
(3)टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकणारे असते.
उत्तर : (१) टुंड्रा प्रदेशातील हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २०” ते ३० से असते. हवामानाची ही स्थिती वनस्पतीच्या वाढीसाठी पोषक नसते. (२) टुंड्रा प्रदेशातील ऊहाळ्यातील सरासरी तापमान सुमारे १० से असते.या कालावधीत सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे छोटी झुडपे, गवत इत्यादी वनस्पती वाढतात. परंतु हिवाळयात या वनस्पती अतिशय थंड हवामानामुळे नष्ट होतात. त्यामुळे टुंड्रा प्रदेशात वनस्पती जीवन अल्पकाळ टिकनारे असते.
प्रश्न . टिपा लिहा :
(१) टुंड्रा प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान,
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : टूंडा प्रदेशाचे स्थान सुमारे ६५ ते ९० उत्तर अक्षवृताच्यादरम्यान आहे (२) प्रदेश या प्रदेशात ग्रीनलंड उत्तर केंनडा, उत्तर युरोप, उत्तर आशीया इत्यादी भूभागांचा/ देशांचा/प्रदेशांचा समावेश होतो.(ब) हवामान : (१) तापमान : टुंड्रा प्रदेशातील उन्हाल्यातील सरासरी तापमान सुमारे १० से व हिवाळयातील सरासरी तापमान सुमारे -२० ते -३० से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे २५ मिमी ते ३०० मिमी आहे. (३) इतर वैशिष्टथे : या प्रदेशात वर्षभर अतिशय थंड हवामान असते.
(२) टुंड्रा प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : टुंड्राप्रदेशात अल्पकाळ टिकणाऱ्या वनस्पती आढळतात त्यांत प्रामुख्याने छोटी झुडपे, खुरटे गवत, फुले, शेवाळ, दगडफूल इत्यादी वनस्पतींचा समावेश होतो. (ब) प्राणिजीवन: टुंड्रा प्रदेशात प्रामुख्याने कॅरियू, रेनडिअर, धुवीय अस्वल. कोल्हा, सील मासे व वॉलरस मासे इत्यादी प्राणी आढळतात.(क) मानवी जीवन : (१) व्यवसाय : टुंड्रा प्रदेशातील लोकांचे शिकार व मासेमारी हे मुख्य व्यवसाय आहेत. (२) घरे : येथील लोक कातड्याचे तंबू (ट्युपिक) व इग्लू घरे यांत निवास करतात. (३) वाहतूक : येथील लोक वाहतुकीसाठी स्लेज गाडीचा वापर करतात. (४) लोकसंख्या : टुंड्रा प्रदेशात लोकसंख्या अतिविरळ आहे. या प्रदेशात स्किमो लोक राहतात.
(३) तैगा प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान,
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान तैगा प्रदेशाचे स्थान सुमारे ५५’ ते ६५’ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे. (२) प्रदेश : या प्रदेशात अलास्कापासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग व युरेशियाचा भाग येतो.
(ब) हवामान : (१) तापमान : तैगा प्रदेशात उन्हाळधातील सरासरी तापमान सुमारे १५’ से ते २०” से व हिवाळयातील तापमान ० से पेक्षा कमी असते. (२) पर्जन्य : या भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे ३०० मिमी ते ५०० मिमी असते (३) इतर वैशिष्ट्ये: या भागात उन्हाळयात पाऊस पडतो व हिवाळयात हिमवृष्टी होते.
(४) तैगा प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : तैगा प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वने आढळतात या वनांतील झाडाची पाने ही अरूंद व टोकदार असतात व झाडांच्या फांदया जमिनीकडे झुकलेल्या असतात. या वनातील झाडांचे लाकूड मऊ हलके असते. या प्रदेशांतील वनांत प्रामुख्याने स्प्रूस फर पाइन ही झाडे आढळतात
(ब) प्राणिजीवन : तैगा प्रदेशात कैरीबू, एल्क, आर्मिन, बीदहर सिल्हहर फॉक्स, मिक, अस्वले इत्यादी प्राणी आढळतात थंडीपासून संरक्षण होण्यासाठी यांतील बहुतांश प्राण्यांच्या अंगावर दाट व मऊ केस असतात
(क) मानवी जीवन : (१) लोकसंख्या : तैगा प्रदेशात कमी लोकसंख्या आढळते. (२) व्यवसाय : येथील लोकाचा शिकार व लाकूडतोड है प्रमुख व्यवसाय आहेत. येथील लोक शेती व्यवसाय कमी करतात
(५) गवताळ प्रदेशाचे (स्टेप्स व प्रेअरी) स्थान, प्रदेश व हवामान.
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान सुमारे ३०° ते ५५° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान खंडांच्या आतील भागात गवताळ प्रदेश आढळून येतो. (२) विविध नावे : हे गवताळ प्रदेश विविध खंडांत/प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. उदा., स्टेप्स (युरेशिया), व्हेल्ड (दक्षिण आफ्रिका), पंपास (दक्षिण अमेरिका), प्रेअरी (उत्तर अमेरिका), डाऊन्स (ऑस्ट्रेलिया) इत्यादी.
(ब) हवामान : (१) तापमान : गवताळ प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २७ से व हिवाळ्यातील तापमान ० से पेक्षा कमी असते. (२) पर्जन्य : या भागातील सरासरी पर्जन्याचे प्रमाण सुमारे ४०० मिमी ते ६०० मिमी असते. या प्रदेशात बहुतेक पाऊस उन्हाळ्यात पडतो.
(६) गवताळ प्रदेशातील (स्टेप्स व प्रेअरी) नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : या प्रदेशात गवताची विस्तीर्ण कुरणे आढळतात. या प्रदेशात कमी उंचीचे व झुपक्यांनी वाढणारे गवत सर्वत्र आढळते. हे गवत हिवाळ्यात नष्ट होते. या प्रदेशात एल्डर, पॉपलर इत्यादी झाडे आढळतात.(ब) प्राणिजीवन : गवताळ प्रदेशात हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू, डिंगो इत्यादी जंगली प्राणी व शेळ्या, मेंढ्या, गाई, बैल, घोडे, गाढव इत्यादी पाळीव प्राणी आढळतात. (क) मानवी जीवन : (१) व्यवसाय : गुरे चारणे (पशुपालन) हा गवताळ प्रदेशातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. (२) जीवनशैली : या प्रदेशात पूर्वी लोक भटके जीवन जगत असत. (३) घरे : या प्रदेशातील लोक कातड्याच्या तंबूत (युट) मध्ये राहतात. (४) किरगीज लोक : या प्रदेशातील किरगीज लोकांचे भटके जीवन आता संपुष्टातआले असून ते आता पक्क्या घरांत वास्तव्य करतात. (५) जगातील गव्हाचे कोठार : या प्रदेशात प्रामख्याने गव्हाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. त्यामुळे गवताळ प्रदेशातील प्रेअरी भागास ‘जगातील गव्हाचे कोठार असे म्हणतात.
(७) उष्ण वाळवंटी प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : विषुववृत्तापासून २०° ते ३०° उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागात उष्ण वाळवंटी प्रदेश आढळून येतो. (२) विविध नावे : उष्ण वाळवंटी प्रदेशात पुढील वाळवंटांचा समावेश होतो : सहारा (उत्तर आफ्रिका), कोलोरॅडो (उत्तर अमेरिका), अटाकामा (दक्षिण अमेरिका), थरचे वाळवंट (आशिया), कलहारी (दक्षिण आफ्रिका) इत्यादी. (ब) हवामान : (१) तापमान : उष्ण वाळवंटी प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ३०° से ते ४५° से व हिवाळ्यातील तापमान सुमारे २०° से ते २५° से असते. (२) पर्जन्य : या भागात पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते. (३) इतर वैशिष्ठ्ये : या प्रदेशात अतिउष्णता असून रात्री खूप थंडी पडते.
(८) उष्ण वाळवंटी प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : या प्रदेशात कमीत कमी पाने असलेल्या व काटेरी वनस्पती असतात. या प्रदेशातील वनस्पतींच्या साली जाड व अरुंद असतात व पाने मेणचट असतात. जमिनीतील ओलावा संपला की या वनस्पती नष्ट होतात. या प्रदेशात प्रामुख्याने निवडुंग, घायपात, पाम, खजूर इत्यादी वनस्पती आढळतात.(ब) प्राणिजीवन : या प्रदेशात अनेक दिवस पाण्याशिवाय जगू शकणारा उंट हा प्राणी आढळतो. या प्रदेशात जमिनीवर प्राण्यांची संख्या कमी आढळते. अतिउष्णतेमुळे या भागात प्राण्यांचे दिवसा जमिनीखाली वास्तव्य असते. या प्रदेशात घोडे, बैल, गाढव, मेंढ्या इत्यादी पाळीय प्राणी आढळतात. याशिवाय साप, उंदीर, सरडे, विंचू इत्यादी प्राणीही आढळतात.(क) मानवी जीवन : (१) लोक : या प्रदेशात राहणारे लोक विविध नावांनी ओळखले जातात. उदा., बदाउन (सहारा), बुशमेन (कलहारी), अबॉरिजिन (ऑस्ट्रेलिया). या प्रदेशातील लोक त्यांच्या अनेक गरजा जनावरांपासून पूर्ण करतात. (२) व्यवसाय : या प्रदेशात मरूदघाने व नदयांची खोरी या ठिकाणी शेती केली जाते
(९) गवताळ प्रदेशाचे (सुदान) स्थान, प्रदेश व हवामान.
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेस ५ ते २० अक्षयृत्तांच्या दरम्यान गवताळ प्रदेश (सुदान) आढळतो. (२) विविध नावे : हा प्रदेश वेगवेगळवा खंडांत पुढील नावांनी ओळखला जातो : सॅव्हाना (आप्रिका), क्वीन्सलंड (ऑस्ट्रेलिया), दक्षिण पार्कलैंड (आफ्रिका), लॅनोज व कॅंम्पोज ( दक्षिण अमेरिका) व इतर गवताळ प्रदेश (ब) हवामान : (१) तापमान : गवताळ प्रदेश ( सुदान) येथे उन्हाळयातील सरासरी तापमान सुमारे ३५’ से व हिवाळयातील तापमान सुमारे २४ से असते. ( २) पर्जन्य : या भागात सुमारे २५० मिमी ते १००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ट्ये : येथील उन्हाळा उष्ण व दमट आणि हिवाळा उबदार व कोरडा असतो.
(१०) गवताळ प्रदेशातील (सुदान) नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : गवताळ प्रदेश (सुदान) येथे उंच व दाट गवत आढळते. या भागातील गवत सुमारे सहा मीटर उंच वाढते. उदा., हत्तीगवत या प्रदेशात तुरळक वृक्ष छत्रीसारखा आकार असणारी झाडे आढळतात. उदा., बेल, बोर, घायपात, अननस, निवडुंग इत्यादी (ब) प्राणिजीवन : गवताळ प्रदेश (सुदान) येथे तृणजीवी प्राण्यांची व मांसभक्षक प्राण्यांची विपुलता आढळते. या भागातील प्राण्यांचे पाय चपळ असतात बहुतांश प्राण्यांच्या अंगावर रंगीत पट्टे व ठिपके असतात. या प्रदेशात प्रामुख्याने सिंह, चित्ता, तरस, लांडगा, जिराफ, झेता, हत्ती, गेंडा, रानबैल, रेडा, कांगारू, एमू इत्यादी प्राणी आढळतात (क) मानवी जीवन : (१) विविध जमातींचे लोक : या प्रदेशात झूलू, हौसा, मसाई इत्यादी जमातीचे लोक राहतात. (२) घरे : या प्रदेशातील लोक मातीच्या भिंती व गवताचे छप्पर असलेल्या साध्या घरात राहतात. या प्रदेशातील घरांना खिडक्या नसतात. या प्रदेशातील काही जमातींचे लोक ‘क्रॉल’ या ठेंगण्या व गोलाकार झोपडयात राहतात. (३) व्यवसाय : या प्रदेशांतील लोकांचे शिकार व पशुपालन हे प्रमुख व्यवसाय आहेत.
(११) विषुववृत्तीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ० ते ५° अक्षवृत्तांच्या दरम्यान विषुववृत्तीय प्रदेश आढळतो. (२) प्रदेश या प्रदेशात मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर, गिनी व कांगो किनारा, अॅमेझॉन नदीचे खोरे इत्यादी भूमागांचा/देशांचा / प्रदेशांचा समावेश होतो. (ब) हवामान : (१) तापमान : या प्रदेशात सरासरी तापमान २७’ से असते. उन्हाळयातील तापमान सुमारे ३०° से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात सरासरी २५०० ते ३००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ठे : या प्रदेशातील उष्ण व दमट हवामानामुळे येथील झाडपाला कुजतो व हवा रोगट बनते. या प्रदेशात जास्त उष्णता असते व येथे वर्षभर पाऊस पडतो.
(१२) विषुववृत्तीय प्रदेशातील नैसर्गिक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन,
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : विषुववृत्तीय प्रदेशात धनदाट सदाहरित वने आढळतात या वनांमधील वनस्पतींमध्ये भरपूर विविधता आढळते. या प्रदेशात ठिकठिकाणी दलदलयुक्त प्रदेश आढळतात या प्रदेशातील वृक्षांचे लाकूड कठीण असते. या प्रदेशात महोगनी, ग्रीन-हार्ट, रोजवूड, एबनी इत्यादी वृक्ष मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. (ब) प्राणिजीवन : विषुववृत्तीय प्रदेशातील प्रण्यांमध्ये खूप विविधता आढळते. येथील दलदलीच्या प्रदेशात सुसर, पाणघोड़ा, अॅनाकॉडा इत्यादी जलचर आढळतात. या प्रदेशातील उंच झाडांवर गोरिला, चिंपांझी, हॉनबिल इत्यादी प्राणी राहतात. या प्रदेशात अनेक विषारी कीटक आढळतात उदा., त्से-से माशी. (क) मानवी जीवन : (१) लोक : विषुक्वृत्तीय प्रदेशात कमी लोकवस्ती आढळते. या प्रदेशात प्रामुख्याने पिग्मी, बोरो इंडियन, सेमांग आदिवासी जमातीचे लोक राहतात. (२) घरे : येथील लोक झाडांवर घरे बांधून राहतात.(३) व्यवसाय : येथील लोकांचे जीवन निसर्गावर अवलंबून असते.
(१३) भूमध्य सागरी प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान.
उत्तर : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : भूमध्य सागरी प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ३०’ ते ४० अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागांत आढळतो. (२) प्रदेश : या प्रदेशात पोर्तुगाल, स्पेन, अल्जेरिया, ट्की, कॅलिफोर्निया, मध्य चिली, नै्रत्य व आग्नेय ऑस्ट्रेलिया इत्यादी भूभागांचा समावेश होतो. (ब) हवामान : (१) तापमान : भूमध्य सागरी प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान सुमारे २१° से ते २७° से आणि हिवाळ्यातील तापमान सुमारे १०° से ते १४” से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात सरासरी ५०० ते १००० मिमी पाऊस पडतो. (३) इतर वैशिष्ट्ये : येथील उन्हाळे कोरडे असतात व येथे हिवाळ्यात पाऊस पडतो.
(१४) भूमध्य सागरी प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन.
उत्तर : (अ) नैसर्गिक वनस्पती : भूमध्य सागरी प्रदेशातील झाडांची पाने जाड, लहान व मेणचट असतात. या प्रदेशात प्रामुख्याने जाड सालांची झाडे आढळतात. उदा., ऑलिव्ह, ओक, चेस्टनट इत्यादी. येथील कमी पावसाच्या भागात गवत वाढते व पर्वतीय भागात सूचिपणी वनस्पती आढळतात. (ब) प्राणिजीवन : भूमध्य सागरी प्रदेशातील अनेक लोक पशुपालन व्यवसाय करतात. या व्यवसायामुळे या प्रदेशात पाळीव प्राण्यांची संख्या जास्त आढळते. या प्रदेशात शेळ्या, मेंढ्या, गाई, खेचरे, घोडे इत्यादी प्राणी पाळले जातात. (क) मानवी जीवन : (१) संस्कृतींचा उदय : भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतींचा विकास झाल्याचे आढळून येते. (२) व्यवसाय : या प्रदेशातील लोकांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. या प्रदेशात फळांची व फुलांची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. (३) आहार : या प्रदेशातील लोकांच्या आहारात प्रामुख्याने गव्हापासून बनवलेल्या विविध पदार्थांचा मुख्य अन्न म्हणून समावेश होतो. (४) पोशाख : या प्रदेशातील लोक रंगीबेरंगी कपडे परिधान करतात.
प्रश्न . पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा :
(१) पश्चिम युरोपीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान यांविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर : पश्चिम युरोपीय प्रदेशाचे स्थान, प्रदेश व हवामान यांविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे : (अ) स्थान व प्रदेश : (१) स्थान : पश्चिम युरोपीय प्रदेश विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस ४५° ते ६५* अक्षवृत्तांच्या दरम्यान व खंडांच्या पश्चिम भागांत आढळतो. (२) प्रदेश : या प्रदेशात नॉ्वे डेन्मार्क, आयलंड, ब्रिटिश कोलंबिया, दक्षिण चिली, न्यूझीलंड इत्यादी भूभागांचा / देशांचा समावेश होतो (ब) हवामान : (१) तापमान : पश्चिम युरोपीय प्रदेशातील उन्हाळ्यातील सरासरी तापमान समारे २०” से आणि हिवाळ्यातील सरासरी तापमान सुमारे ५’ से असते. (२) पर्जन्य : या प्रदेशात वर्षभर पाऊस पडतो. येथील पावसाचे प्रमाण सरासरी ५०० मिमी ते २५०० मिमी इतके असते. (३) इतर वैशिष्ठ्ये : या प्रदेशात पश्चिमी वार्याच्या आवर्तापासून पाऊस पडतो. या प्रदेशाचे हवामान वर्षभर सौम्य असते.
(२) पश्चिम युरोपीय प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन यांविषयी वर्णन करा
उत्तर : पश्चिम युरोपीय प्रदेशातील नैसर्गीक वनस्पती, प्राणिजीवन व मानवी जीवन पुढीलप्रमाणे आहे : (अ) नैसर्गिक वनस्पती : पश्चिम युरोपीय प्रदेशात वर्षभर हिरवेगार गवत आढळते. येथील झाडांची पाने हिवाळयात गळून पडतात. या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपणीं वृक्ष व कमी उंचीचे गवत आढळते. या प्रदेशात ओक, बीच, मेपल, एल्म, पाईन, स्प्रूस पॉपलर इत्यादी वृक्ष आढळतात. (ब) प्राणिजीवन : या प्रदेशातील काही लोक पशुपालन व्यवसाय करतात. त्यामुळे या प्रदेशात पाळीव प्राण्यांची संख्या जास्त दिसून येते. याशिवाय अस्वले, लांडगे, कोल्हे इत्यादी वन्य प्राणीही आढळतात. (क) मानवी जीवन : (१) लोक : सौम्य व आल्हाददायक हवामानामुळे पश्चिम युरोपीय प्रदेशातील लोक उत्साही व उदघोगी दिसून येतात. या प्रदेशात प्राचीन काळापासून दर्यावर्दी लोक मोठ्या प्रमाणावर आढळतात. (२) पोशाख : या प्रदेशातील लोक प्रामुख्याने लोकरीच्या कपड्यांचा वापर करतात. ( ३) व्यवसाय : या प्रदेशात दवितीय व तृतीय व्यवसायांचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.
प्रश्न: नैसर्गिक प्रदेशांचा व्यवसायांवर कसा प्रभाव पडतो, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर : विविध नैसर्गिक प्रदेशात विविध प्रकारची भूस्वरूपे, हवामान व मृदा आढळतात. म्हणजेच विविध नैसर्गिक प्रदेशांत विविध प्रकारची साधनसंपत्ती उपलब्ध असते. परिणामी विविध नैसर्गिक प्रदेशांत विविध व्यवसाय केले जातात. नैसर्गिक प्रदेशांचा व्यवसायांवर कसा प्रभाव पडतो. हे पूढील उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करता येते
(अ) मान्सून प्रदेश : मान्सून प्रदेशात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ठरावीक ऋतुंत पाऊस पडतो. येथील पर्जन्य अणि तापमान अनेक प्रकारच्या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल असते. त्यामुळे मान्सून प्रदेशात प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसाय केले जातात
(ब) विषुववृत्तीय प्रदेश विषुववृत्तीय प्रदेशात सदाहरित वने मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात वनोत्पादनावर आधारित लाकूडकटाई व डिंक, मध, रबर, लाख इत्यादी पदार्थ गोळा करण्याचे व्यवसाय केले जातात
(क) तैगा प्रदेश : तैगा प्रदेशातील सूचिपणीं वनांमध्ये स्मूस फर, पाईन, रेडवूड इत्यादी वृक्ष आढळतात. या वृक्षाचे लाकूड मऊ असते. त्यामुळे या प्रदेशात प्रामुख्याने लाकूडतोड व्यवसाय चालतो.
(ड) टुंडा प्रदेश : टुंड्रा प्रदेशात समुद्रात सील मासे व वॉलरस मासे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. याशिवाय या प्रदेशात शिकारीचा व्यवसायही मोठया प्रमाणावर केला जातो.