स्वाध्यायमाला – प्रश्नोत्तरे | General Science |सामान्य विज्ञान – 4 – सजीवातील पोषण

सामान्य विज्ञान – 4 – सजीवातील पोषण 


प्रश्न 1. गाळलेल्या जागा भरा :

(1) पोषकद्रव्यांचे बृहत् पोषकद्रव्ये आणि सूक्ष्म पोषकद्रव्ये या दोन गटांत वर्गीकरण केले जाते.

(2) वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. या क्रियेला   प्रकाश-संश्लेषण म्हणतात.

(3) पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात.

(4) वनस्पतींमध्ये  जलवाहिन्या,व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात.

(5) अझिटोबॅक्टर. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात रूपांतर करतात.

प्रश्न . पुढील विधानात एक शब्द चुकीचा आहे. तो बदलून वाक्य दुरुस्त करा व पूर्ण वाक्य पुन्हा लिहा :

(1) सर्वच प्राणी स्वयंपोषण दाखवतात.

उत्तर  सर्वच प्राणी परपोषण दाखवतात.

(2) प्रकाश-संश्लेषणाच्या क्रियेत कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडला जातो.

उत्तर  प्रकाश-संश्लेषणाच्या क्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो.

(3) पानांमध्ये तयार झालेले अन्न जलवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते.

उत्तर  पानांमध्ये तयार झालेले अन्न रसवाहिन्यांमार्फत वनस्पतींच्या इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते.

(4) अझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव दुविदल शिंवावगीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात

 उत्तर  रायझोबिअम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावगीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात

(5) नायट्रोजनच्या वातावरणीय स्थिरीकरणामध्ये नायट्रिक ऑसिड तयार होते.

उत्तर  नायट्रोजनच्या वातावरणीय स्थिरीकरणामध्ये नायट्रिक ऑक्साइड तयार होते.

प्रश्न. योग्य जोड्या जुळवा :

1 उत्तरे

(1) परजीवी वनस्पती  अमरवेल

(2) कीटकभक्षी वनस्पती – ड्रॉसेरा

(3) मृतोपजीवी वनस्पती – भूछत्र

(4) सहजीवी वनस्पती  दगडफूल

2 उत्तरे- 

(1) अन्नग्रहण    अन्नाचा शरीरात प्रवेश

(2) पचन       विद्राव्य घटकांत रूपांतर

(3) शोषण   विद्राव्याचे रक्तात मिसळणे

(4) सात्मीकरण – पेशी व ऊतींमध्ये वहन व ऊर्जानिर्मिती

(5) उत्सर्जन  उर्वरित अन्नघटक शरीराबाहेर टाकणे

3 उत्तरे

(1) नायट्रोजन       प्रथिने व हरितद्रव्यातील महत्त्वाचा घटक

(2) फॉस्फरस      प्रकाश ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर

(3) मॅग्नेशिअम व लोह – हरितद्रव्य निर्मिती

(4) मँगनीज व झिंक  प्रमुख संप्रेरक निर्मिती

(5) पोटॅशिअम   चयापचय

प्रश्न . पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा :

(1) सजीवांना पोषणाची गरज का असते?

उत्तर : (1) सजीवांमध्ये काही जीवनप्रक्रिया अखंडपणे सुरू असतात. (2) या जीवनक्रिया सुरळीत चालू राहाव्यात, यासाठी पोषण आवश्यक असते. (3) आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि शरीर निरोगी राखण्यासाठी देखील पोषणाची गरज असते.

(2) वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.

उत्तर : (1) ‘प्रकाश-संश्लेषण’ या प्रक्रियेने वनस्पती अन्न तयार करतात. जमिनीतील पाणी, क्षार व इतर पोषकतत्त्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य (Chilorophyll) व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात. (2) म्हणून वनस्पतींना स्वयंपोषी म्हटले जाते.

(3) परपोषी वनस्पती म्हणजे काय ? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा. किंवा परपोषी वनस्पती कशा जगत असतील? त्या कोठून अन्न मिळवत असतील?

उत्तर : (1) ज्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते, अशा वनस्पतींना परपोषी वनस्पती असे म्हणतात. यांचे पूढील प्रकार आहेत : कीटकभक्षी, परजीवी आणि मृतोपजीवी. त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. (2) अन्नासाठी या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात आणि त्यांच्यापासून आपले अन्न मिळवतात. अशा वनस्पतींना परजीवी वनस्पती म्हणतात. (3) यांचे दोन प्रकार आहेत : 

(अ) अर्ध परजीवी. उदा., बांडगूळ, बांडगूळ आधारासाठी मोठ्या वृक्षावर असतो. या वृक्षाकडून क्षार व पाणी शोषून स्वतःचे अन्न तयार करतो. 

(ब) संपूर्ण परजीवी. उदा., अमरवेलीत अजिबात हरितद्रव्य नसते त्यामुळे ती संपूर्णरीत्या आश्रयी वनस्पतींबरच अन्नासाठी अवलंबून असते. (4) कीटकांचे भक्षण करुन जगणाच्या वनस्पतंना कीटकभक्षी बनस्पती म्हणतात. उदा., घटपणीं, ड्रॉंसेरा (5) मृतोपजीवी वनस्पती मृत अवशेषाचे विघटन करून पोषकद्रवये शोषण करतात. उदा.. कवकवर्गीय सजीव.

(4) दगडफुलाचे वैशिष्ट्य काय?

उत्तर : दगडफूल हे सहजीवी पोषणाचे उदाहरण आहे. यात शेवाल व बुरशी एकत्र राहून एकच रचना बनते. बुरशी शैवालाला निवारा, पाणी व क्षार पुरवते ; तर त्या बदल्यात शैवाल प्रकाशसंश्लेषण करून बुरशीला अन्न पुरवते. या शैवाल व बुरशीला स्वतचे स्वतंत्र अस्तित्व नसते. हेच वैशिष्ट्य दगडफुलात आहे.

(5)) ड्रॉसेरा  वनस्पतीची माहिती लिहा.

उत्तर : (1) ड्रॉसेरा बनस्पती कीटकमक्षी असून ती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगांचा अभाव असणाऱ्या जमिनीत आढळते. (2) ड्रॉसेराची रचना एखादया फुलासारखी दिसते. ती जमिनीलगत वाढते. (3) पाने आकर्षक, गुलाबी, लाल रंगाची असून त्यांच्या कडांना बारीक केसतंतू असतात. या तंतूंबर कीटकांना आकर्षून घेणारे चिकट द्रवाचे बिंदू असतात. (4) श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञाने इ.स. 1737 मध्ये या वनस्पतीचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ या वनस्पतीच्या जातीचे नाव बर्मानी असे आहे 

6] प्राण्यामधील  पोषणाचे विविध टप्पे स्पष्ट करा.

उत्तर : प्राण्यांमध्ये पोषणाचे पाच महत्वाचे ट्पे आहेत. ते म्हणजे अन्नग्रहण, पचन, शोषण, सात्मीकरण, उत्सर्जन.

1) अन्नग्रहण : अन्न मुखाबटे शरीरात घेणे म्हणजे अन्नग्रहण करणे. हा पहिला टप्पा आहे.

2) पचन : निरनिराळ्या विकरांच्या साहाय्याने अन्नाचे रूपांतर विद्वाव्य घटकांत केले जाणे म्हणजे पचन. संपूर्ण पचन संस्थेत अन्नाचे पचन होत असते.

(3) शोषण : या टप्प्यात पचनातून तयार झालेले विद्वाव्य रक्तात शोषले जाते. लहान आतड्यात हे शोषण होते.

4] सात्मीकरण: आतडयातील रक्तवाहिन्यांत शोषलेले द्रावणीय अन्नघटक शरीरातील पेशी व ऊत्तीमधे वाहून नेणे आणि त्यापासून ऊर्जानिर्मिती केली जाणे म्हणजे सात्मीकरण होय.

5) उत्सर्जन : या शेवटच्या टप्प्यात पचन व शोषण न झालेले उर्वरित अन्न गुदद्वारावाटे शरीराबाहेर टाकले जातात.

 7] एकाच पेशीत सर्व जीवनक्रिया होणारे एकपेशीय सजीव कोणते ?

उत्तर  : पोषणासंबंधीच्या सर्व क्रिया एकाच पेशीत होणारे प्राणी म्हणजे अमीबा, युग्लीना आणि पॅरामेशिअम हे सारे एकपेशीय सजीव आहेत.

(8) अमीबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये अन्नग्रहण कसे होते ?

उत्तर : (1) अमीबामध्ये अन्नग्रहणासाठी वेगळे अवयव नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. (2) हा पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. (3) अन्नप्रहणाच्या वेळी अन्नकणाला छद्मपादाच्या साहाय्याने सर्व बाजूंनी वेढून समाविष्ट करतो. (4) त्यानंतर अन्नकणांवर विविध विकरांच्या सहाय्याने  पचन क्रिया धडून तो विद्वाव्य स्वरूपात रूपांतरित केला जातो. (5) छदमपादाच्या साहाय्याने पुढे सरकताना अमीबा न पचलेला उरलेला भाग तेथेच मागे सोडून देतो.

(9]  वनस्पती  कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात? का? 

उत्तर : वनस्पती चीक, डिंक, तेल, राळ अशा पदार्थाच्या स्वरूपात उत्सर्जन करतात. वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते. विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ खोडाच्या साली साठवले जातात किंवा जीर्ण जलवाहिनीत ते साठवले जातात. या पदार्थांचा वनस्पतींना उपयोग नसतो,

प्रश्न 6. कारणे लिहा :

(1) कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.

उत्तर : कीटकभक्षी वनस्पती कीटक खातात आणि आपल्या अन्नाची गरज भागवतात. असे कीटक स्वत:कडे आकर्षित करून घेण्यासाठी त्यांचा रंग आकर्षक असतो.

(2) फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.

उत्तर : कीटकामध्ये खास कार्य करणारे मुखावयव असतात. फुलपाखरू फुलातला रस शोषते, त्यासाठी त्याला नळीसारखी सौंड असते. याचा वापर करून ते अन्नग्रहण करते.

प्रश्न  विचार करा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :

(1) आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का ?

उत्तर : आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करीत असलो, तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो. जसे गह, तांदूळ किंवा कडधान्य, अंडी इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश-संश्लेषण करु शकत नाही. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही.

(2) स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते? का?

उत्तर : स्वयंपोषी सजीवांची संख्या जास्त असते. कारण वनस्पतौंची संख्या जास्त असेल, तरच त्यावर गुजराण करणारे प्राणी तग धरुन राहतील. जर स्वयंपोषी सजीव संख्येने कमी झाले, तर त्यावर अवलंबून असणारे परपोषी सजीव पण नष्ट होतील. म्हणून निसर्गातील अन्नसाखळीत स्वयंपोषी सजीव परपोषी सजीवांपेक्षा जास्त संख्येने असतात.

(3) वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात.असे का?

उत्तर :  वाळवंटी भागात स्वयंपोषी देखील कमी संख्येने असतात. त्यामुळे अवलंबुन राहणारे परपोषी कमी असतात. (2) जिथे अन्नाची चणचण असते, तेथे खाणाच्यांची संख्या रोडावते. (3) समुद्रात आपल्याला दिसत नसले तरी खुप मोठ्या प्रमाणात वनस्पती-प्लवक नावाचे तरंगणारे जीव असतात. (4) त्यांच्यावर आणि प्राणी प्लवकांवर समुद्रातील अन्नसाखळी अवलंबून असते. म्हणून समुद्रामध्ये वाळवंटी भागापेक्षा जास्त संख्येने परपोषी आढळतात.

(4) हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?

उत्तर : हिरव्या भागांत हरितद्रव्य असते. हरितद्रव्य असलेल्या भागातच प्रकाश-संश्लेषण होते. त्यातूनच अन्ननिर्मिती होते. म्हणून हिरव्या भागांव्यातिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.

(5) बाह्यपरजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?

उत्तर : परजीवी प्राणी अन्नासाठी पोशिंदघावर अवलंबून असतात. बाह्यपरजीवी चूषकासारखे किंवा सुईसारखे मुखावयव वापरून रक्त शोषतात. उदा., डास, ढेकूण इत्यादी. डासांसारखे कीटक मलेरिया, ढेंगू यांसारखे रोग संक्रमित करतात. अंतःपरजीवी शरीरात राहत असल्यामुळे निरनिराळ्या प्रकारचे रोग निर्माण करू शकतात. आपल्या शरीरातले विद्राव्य अन्न शोषून ते आपले कुपोषण करतात. बाह्यपरजीवी व अंतःपरजीवी प्राण्यांमुळे आरोग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

प्रश्न  जरा डोके चालवा 

(1) बांडगूळ वनस्पतीमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया कोणामार्फत होते ?

उत्तर : बांडगूळ स्वतःच प्रकाश-संश्लेषण क्रिया करू शकतो. 

(2) त्यांना पाणी व क्षार कोठून मिळतात?

उत्तर : प्रकाश-संश्लेषण क्रियेसाठी आवश्यक असलेली खनिजे आणि पाणी यांचा पुरवठा तो आधारक वनस्पतींकडून शोषून घेतो. त्यासाठी त्याच्यात विशेष अनुकूलित अवयव असतात.

(3) बांडगूळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते ?

उत्तर : बांडगूळ पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून नसते. आधारक वृक्षाकडून खनिज व पाणी शोषून घेतल्यावर स्वत:चे अन्न ते स्वतः बनवू शकते म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती असे ओळखले जाते.

(4) घटप्णींमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटकभक्षण का करते ?

उत्तर : घटपणी वनस्पती ज्या मातीत वाढते तेथे नायट्रोजनची कमतरता असते. वाढीसाठी आणि प्रथिन- निर्मितीसाठी आवश्यक नायट्रोजन मातीतून मिळत नसल्याने घटपण्णी वनस्पती कीटकभक्षण करते.

(5) पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश-संश्लेषण क्रिया कशी होते ? 

उत्तर : रंगीत वनस्पतींमध्ये कॅरोटीनॉइड, अन्थोसायॅनिन आणि झॅन्थोफिल अशा प्रकारची रंगद्रव्ये असतात. कॅरोटीनॉइड सूर्यप्रकाशातला हिरवा-निळा वर्ण शोषून घेतो. त्याच्याकडून जो प्रकाश परावर्तित होतो तो आपल्याला केशरी पिवळा भासतो. झॅन्थोफिलमुळेही पिवळा रंग येतो. अॅन्थोसायॅनिनमुळे वनस्पती जांभळ्या, तांबड्या रंगांच दिसतात. ही रंगद्रव्ये जरी असली, तरी त्या सर्व पानांत हरितद्रव्य-क्लोरोफिल असतेच. केवळ या रंगद्रव्यांचे प्रमाण जास्त असल्याने पाने हिरवी भासत नाहीत. प्रकाश-संश्लेषण क्लोरोफिलच्याच साहाय्याने होते. पण बाकीचं रंगद्रव्ये काही प्रमाणात सौर-ऊर्जा शोषून हरित द्रव्याच्या रेणूंना देतात.

(6) रासायनिक संश्लेषण म्हणजे काय ? कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात ? 

उत्तर : (1) कार्बन डायऑक्साइड, मिथेन, हायड्रोजन, हायड्रोजन सल्फाइड अशा रासायनिक पदार्थांचा वापर  करून त्यांतून ऊर्जा घेऊन अन्ननिर्मिती करणे म्हणजे रासायनिक संश्लेषण होय.(2) कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषण करीत नाही. केवळ जीवाणू रासायनिक संश्लेषण करु शकतात. जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही तेथे अशा प्रकारचे जीवाणू अन्ननिर्मिती करीत असतात. जीवाणू वनस्पती नाहीत. ते वेगळ्या सजीव सृष्टीत समावेश केलेले आहेत.

Leave a Comment