स्वाध्यायमाला प्रश्नोत्तरे -7 वी सामान्य विज्ञान 2 – वनस्पती रचना व कार्ये

वनस्पती रचना व कार्ये 

 प्रश्न 1. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा :

(1) बीच्या आतून जमिनोच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ  म्हणतात.

(2) मुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम  हे केसासारखे धागे असतात.

(3) एकदल वनस्पतीमध्ये  तंतूमय मुळे असतात.

(4) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे  म्हणतात.

(5) पानाचया पसरट भागाला  पर्णपत्र,  म्हणतात, तर पुढच्या टोकाला पणाग्र म्हणतात.

(6) कळी अवस्थेत पाकळया हिरव्या रंगाच्या पानासारख्या निदलपुंज. या आवरणाने झाकलेल्या असतात.

प्रश्न . पुढील वाक्ये चूक आहे  की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा :

(1) जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात.

 चूक. (जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर म्हणतात.)

(2) खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात.

बरोबर. 

(3) गाजर व मुळा ही रूपांतरित खोडे आहेत.

चूक. (गाजर मुळा ही रूपांतरित मुळे आहेत.)

(4) एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असणाऱ्या पानांना संयुक्त पान म्हणतात.

चूक. (एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असणाऱ्या पानांना साधे पाন म्हणतात.) 

(5) अंडाशयातील बोजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर फळात होते.

 चूक. (अंडाशयातील बोजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते.)

प्रश्न-  प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा

गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्रावर काटे.

उत्तर : (1) गुळगुळीत पृष्ठ भाग : केळ केळीच्या झाडाला गुळगुळीत पाने असतात. केळीचे झाड हे जगातली सर्वांत मोठी मांसल खोड असलेली सपुष्प वनस्पती आहे. केळीचे झाड कंदापासून निर्माण होते. याचे खोड छदमखोड असते. खरे खोड नसते. पानांचेच तळ रुंद होऊन एकमेकांभोवती घट्टपणे गुंडाळले जातात.याला आपण केळीचे खांब असेही म्हणतो. केळीची पाने मऊ, गुळगुळीत आणि मोठी असतात. त्यांचा उपयोग जेवणासाठी पण केला जातो. केळीच्या झाडाला फूल येते, त्याला केळफूल म्हणतात. केळफुलापासूनच केळयाचे घड मिळतात. एका घडात साधारणपणे 20 पर्यंत केळी असतात.

2) खडबडीत पृष्ठभाग : पारिजातक – पारिजातकाचे पान खडबडीत असते. पारिजातक/प्राजक्त हे छोटे झुडूप आहे. 10 मीटरपर्यंत वाढणाऱ्या या झाडाला लालचुटुक देठाची पांढरी शुभ्र फुले येतात. सकाळी पारिजातकाच्या झाडाखाली अशा फुलांचा सडा पडलेला दिसतो. याची पाने खरखरीत व खडबडीत दिसतात. परंतु यात खूप औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदिक आणि होमिओपथिक औषधांत प्राजक्ताच्या पानांचा वापर केला जातो. पारिजातकाच्या झाडाबद्दल पुराणात अनेक आख्यायिका आहेत. इंग्रज मात्र याला दुःखी झाड किंवा दु:खाचे झाड म्हणतात याची फुले सूर्य उगवल्यावर सुकत जातात.

3) मांसल पर्णपत्र : जलपर्णी– जलपरणींची पाने मांसल असतात. जलपर्णी ही पाण्यात वाढणारी आणि पाण्यावर तरंगणारी वनस्पती आहे. त्याचे खोडदेखील फुगीर आणि हिरवे असते. या वनस्पतीला वर्षभर निळया रंगाची फुले येतात. एका वर्षात एक वनस्पती तीन हजारांहन अधिक वियांची निर्मिती करू शकते. तिचा प्रसार झपाट्याने होतो आणि तिचे नियंत्रण करावे लागते. जलपणींच्या अनियंत्रित वाढीमुळे माशांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या वाढीवर, जलपरिसंस्थेवर आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होतो.पाणवठ्याचा नाश होतो. याला जलाचे समृद्धीकरण असेही म्हणतात.1

4) पर्णपत्रावर काटे : केवडा – केवड्याच्या पर्णपत्रावर काटे असतात. केवड्याची वनस्पती साधारणपणे  1 मीटर उंचीचे छोटे झुडूपच असते. याचे खोड मजबूत आणि मध्यम आकाराचे असते. झाडाच्या वरच्या टोकाला पानाचा मुकुट असल्यासारखा भासतो. केवडयाची सुगंधी पाने स्त्रिया केसात माळतात. स्त्री-पुष्प आणि नर-पुष्प निरनिराळ्या झाडांवर येतात.

प्रश्न  पुढील प्रश्नांची उत्लरे लिहा

(1) वनस्पतींच्या अवयवांची कार्य स्पष्ट करा.

उत्तर : (1) मूळ, खोड, पाने, फुले, फळे हे बनस्पतींचे निरनिराळे अवयव आहेत.

(2) मुळांची कार्ये : (अ) बनस्पतीला मातीत घट्ट रोबून आधार देणे. (ब) मातीतील पाणी व क्षार यांचे

शोषण करणे. (क) काही मूळे रूपांतरित होतात. यांच्याकरवी श्वसन, प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे कार्ये केली जातात.

3) खोडांची कार्ये (अ) पर्णसंभार पकन ठेवणे. (ब) निवडुंगाचे खोड प्रकाश-संश्लेषण काते.

(क) रुपांतरित खोडे अन्नसंचय, प्रजनन, आधार देणे अशी कार्ये करतात. ( ड) मुळांनी शोषलेले पाणी आणि

पानांत तयार झालेले अन्न बनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणे.

(4) पानांची कार्ये (अ) प्रकाश-संश्लेषण करुन अन्ननिर्मिती (ब) बाश्पोत्सर्जन (क) रूपांतरित पाने प्रजनन, अन्नसंचय, आधार देणे अशी कार्ये करतात.

फुलांची कार्ये प्रजनन किंया पुनरुत्पादन करणे.

(फळांची कार्ये : अन्नसंचय करणे आणि बीजाचे संरक्षण करणे.

2) सोटमुळाची रचना स्पष्ट करा.

उत्तर : (1) सोटमूळ हे द्विदल वनस्पतीतील मुख्य मूळ असते. ते आदिमुळापासून तयार होते. (2) या

सोटमुळाला जमिनीमध्ये उपमुळे फुटतात. (3) उपमुळे तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. त्यामुळे झाडाला

आधार मिळतो. (4) सोटमुळांच्या टोकांच्या भागांवर मूलरोम हे केसांसारखे धागे असतात. यातून पाणी व क्षार यांवच शोषण होते. (5) मुळाच्या टोकाला मूलटोपी असते. टोकाकडचा भाग नाजूक असल्याने त्याला इजा होऊ नये यासाठी मूलटोपीचा उपयोग होतो.

(3) मुळाचे विविध प्रकार लिहा.

उत्तर : (1) सोटमूळ व तंतुमय मूळ है मुळांचे दोन प्रमुख प्रकार आहेत. (2) सोटमूळ द्विदल वनस्पतीमध्ये असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. (3) काही विशिष्ट कार्य करण्यासाठी मुळांत रूपांतर होते. अशा मुळांना रूपांतरित मुळे म्हणतात हवाई मुळे, आपार मुळे, पावती मुळे, श्वसन मुळे ही रूपांतरित मुळे आहेत. (4) काही कनस्पतोंत जमिनीच्या वरील खोडांपासून मुळे फुटतात. यांना आगंतुक मुळे असे म्हणतात.

(4) खोडाचे विविध भाग कोणते?

उत्तर : (1) खोडावर जेथून पाने फुटतात त्याला पेरे म्हणतात. (2) खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे म्हणतात. (3) खोडाच्या अग्रभागावर मुकुल असतो. (4) जिथे फांदधा फुटतात, तेथे देखील मुकुल असतात.

(5) पानाच्या विविध भागांचे वर्णन करा.

उत्तर : (1) बहतेक बनस्पतौंची पाने हिरव्या रंगाची असतात. (2) पानाचा पसरट भाग म्हणजे पर्णपत्र आणि पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा होय. पर्णपारा निरनिराळया प्रकारच्या असतात. जसे, सलग, खंडित किंवा दंतेरी) पर्णपत्राचे पुढचे टोक म्हणजे पर्नाग्र होय. याचे मुख्यतः निमुळते. रोकदार व गोलाकार असे प्रकार आहेत. (4) काही पानांना देठ असतात, तर काही पाने देठाशिवाय असतात. 

शिराविन्यास म्हणजे काय? त्याचे उदाहरणासहित प्रकार लिहा.उत्तर : (1) पानांमध्ये असण्याच्या शिरांची रचना म्हणजे शिराविन्यास होय. जाळीदार शिराविन्यास आणिसमांतर शिराविन्यास असे दोन मुख्य प्रकार आहेत. (2) जेव्हा पर्णपत्राच्या मधोमघ एक जाड शीर असते आणिया शिरेस उपशिरा फुटून त्याचे जाळे तयार होते, त्यास जाळीदार शिराविन्यास म्हणतात. (3) मध्यशिरेमुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांत विभागल्यासारखे दिसते. (4) पानातील सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिकटलेल्याभागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांस समांतर जातात, तेव्हा त्यास समांतर शिराविन्यास असे म्हणतात.(5) उदाहरणे : जाळीदार शिराविन्यास-द्विदल वनस्पती पिंपळ, जास्वंद. समांतर शिराविन्यास-एकदल वनस्पती मका, गह, इत्यादी.
पानांच्या मांडणीनुसार आणि पर्णपत्रांच्या आकारानुसार त्यांचे प्रकार कोणते ?उत्तर : पानांच्या मांडणीनुसार एकांतरित, आवर्ती, संमुख आणि वर्तुळाकार असे प्रकार आहेत. पानांच्याआकारानुसार गोलाकार, हस्ताकार, तरफदार आणि लंबाकार असे प्रकार आहेत.
चिंच, आंबा या वनस्पतींची मुळे तंतुमय असती, तर काय झाले असते?उत्तर : चिंच आणि आंबा हे मोठे वृक्ष आहेत. त्यांना आधार देणारी मुळेसुद्घा तितकीच भक्कम पाहिजेत.जर या वृक्षांची मुळे तंतुमय असती, तर ते उन्मळून पडले असते.मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल ?उत्तर : मुळांच्या टोकाला इजा झाली तर झाडाची वाढ खुंटेल. सुरुवातीच्या काळात झाड तग धरेल परंतुइजा झालेल्या मुळातून पाणी आणि अन्न यांचे आवश्यक तितके शोषण न झाल्याने झाड कमकुवत होईल.आधारही व्यवस्थित न मिळाल्याने थोडयाच दिवसांत झाड मरेल.
मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत ?उत्तर : मेथीमध्ये सोटमूळ असते. परंतु हे खोलवर जात नाही. पालकाचेही सोटमूळ असते; परंतु पालकाच्यामुळांना खूप उपशाखा फुटतात. त्या मुळांच्या काही शाखा आडव्याही पसरतात. कांदघाला तंतुमय मुळे असतात.त्यांच्या रूपांतरित चकतीवजा खोडातून ती फुटतात.फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो ? उत्तर : फुलपाखरे परागीभवन करतात. एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत परागकण वाहन नेण्याचे कार्य करते

Leave a Comment